देशात पेट्रोल-डिझेलचे मुबलक उत्पादन! इंधन मागणीच्या वाढीनंतर पेट्रोलियम मंत्रालयाची स्पष्टोक्ती | पुढारी

देशात पेट्रोल-डिझेलचे मुबलक उत्पादन! इंधन मागणीच्या वाढीनंतर पेट्रोलियम मंत्रालयाची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. जून-२०२१ च्या पंधरवड्याच्या तुलनेत आता मागणीत  ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये ही वाढ नोंदवण्यात आली. ही वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे उत्पादन पुरेसे आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

संबंधित राज्यांमध्ये बहुतांश पुरवठा खासगी  कंपन्या करतात. परंतु, शेतीविषयक कामांसह मोठ्या प्रमाणात खदेरी करणारे ग्राहक किरकोळ दुकानांकडे वळल्यामुळे आणि खासगी विपणन कंपन्यांकडून होणाऱ्या विक्रीत लक्षणीय घट झाल्याने मागणीत हंगामी वाढ झाल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे.

बेकायदेशीर बायो-डिझेल विक्रीवर सरकारने कारवाई केल्याने किरकोळ दुकानांच्या डिझेल विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात, काही भागांमध्ये सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातील किरकोळ विक्री पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांकडून पुरवठ्यातील अडचणींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु, अतिरिक्‍त मागणी पूर्ण करण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या पुरेशा पुरवठ्याची सुनिश्चिती कंपन्या करीत असून देशाच्या ऊर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्‍याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा  .

Back to top button