ओम- स्वीटूच्या लग्नात विघ्न तर येणार नाही ना?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : झी मराठी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही लोकप्रिय मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. त्यात स्वीटू आणि ओम यांचे आता लग्न होणार आहे. म्हणजेच स्वीटू आता मिसेस खानविलकर होणार आहे. पण ओमची बहीण मालविका ही स्वीटू आणि ओम यांच्या लग्नात काही अडथळे तर आणणार नाही ना, याची धाकधूक प्रेक्षकांना लागली आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू आणि ओम यांच्या प्रेमाची स्वीटूची आई नलू परीक्षा घेते. या परिक्षेत पास होऊन ओम हा साळवी कुटुंबियाचे मन जिंकतो. आणि दोघांच्या लग्नाची बोलणी होऊन लग्न ठरते. आता दोघांचे लग्न होत आहे.

त्यांचा लग्नसोहळा २ तासांच्या विशेष भागात २२ ऑगस्ट रोजी रविवारी, संध्याकाळी ७ वाजता पहायला मिळणार आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत आता ओम आणि स्वीटूच्या लग्नाची लगबग पहायला मिळेल. ओम याच्यासह स्वीटू, शकू, नलू, दादा, सुमन, चिन्या, मालविका या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

एका गरीब कुटुंबातील मुलगी श्रीमंत घरातील सून होणार असल्याचे या मालिकेत दाखवण्यात आले आहे.

देवमाणूस मालिकेचा शेवट!

दरम्यान, झी मराठीवरील क्राईम थिल्लर बहुचर्चित देवमाणूस मालिकेचा शेवटचा दोन तासांचा एपिसोड गेल्या रविवारी दाखवण्यात आला. देवमाणूस मालिकेतील या शेवटच्या एपिसोड विषयी प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती. पण या मालिकेच्या शेवटाने प्रेक्षक गोंधळात पडले.

शेवटच्या एपिसोडमध्ये डॉक्टरच्या डोक्यात चंदा दगड घालते. तर चंदाला डिंपल मारते. पण शेवटी डॉक्टरचा मृत्यू काही होत नाही. आणि त्याला शिक्षा देखील झालेली नाही.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : सरू आजीला शिव्या कुणी शिकवल्या ? | Actress Rukmini sutar Exclusive

https://www.youtube.com/watch?v=SJZt0DdkXf0

Exit mobile version