आजचे राशिभविष्य १७ ऑगस्ट २०२१ | पुढारी

आजचे राशिभविष्य १७ ऑगस्ट २०२१

आजचे राशिभविष्य :

मेष– मानसिक संतुलन बिघडेल आर्थिक परिस्थिती बेताची राहील,संयम आवश्यक आहे.
वृषभ– प्रवासाचे योग संभवतात, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल.
मिथुन– शत्रूंवर मात कराल, वेळ पाळाल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
कर्क– मनाविरुद्ध घटना घडतील, मतभेद होतील, कामांचा वेग मंदावेल.
सिंह– कुटुंबीयांना वेळ द्यावा लागेल. वाहनांची काळजी घेणे आवश्यक आहे, संयम महत्त्वाचा आहे.
कन्या– आत्मविश्वास निर्माण होईल, आर्थिक परिस्थिती सुधारेल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
तूळ– शिळे अन्न खाऊ नये, आहारावर नियंत्रण आवश्यक आहे, अनावश्यक खर्च होतील.
वृश्चिक– मनासारख्या घटना घडतील, कौतुकास्पद कार्य होईल, खरेदीचा आनंद घ्याल.
धनु– आत्मचिंतनाची गरज आहे, कौटुंबिक अस्वास्थ्य राहील, अनावश्यक खर्च होईल.
मकर– विवाहेच्छुकांचे विवाहयोग येतील, भावनाप्रधान होण्याचे प्रसंग येतील.
कुंभ– सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल, वरिष्ठांची मर्जी राखाल.
मीन– संतुलन साधणे आवश्यक आहे, आध्यात्मिक वृत्ती वाढेल, आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस.

 

 

Back to top button