#LordsTest भारत विजयाच्या समीप! सिराजच्या एकाच षटकात अली आणि करन बाद | पुढारी

#LordsTest भारत विजयाच्या समीप! सिराजच्या एकाच षटकात अली आणि करन बाद

लंडन ; पुढारी ऑनलाईन: Ind Vs Eng 2nd Test मोहम्‍मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी केलेल्‍या दमदार फलंदाजीच्‍या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी २७२ धावांचे आव्हान दिले आहे. अजूनही पाचव्या दिवसातील ६० षटकांचा खेळ बाकी आहे. त्यामुळे कसोटी रंगतदार झाली आहे.

इंग्लंडला पहिलाच झटका पहिल्याच षटकांत बसला. बुमराहने बर्न्सला बाद करत भारताला दमदार सुरुवात करून दिली आहे. त्यानंतर दुसऱ्याच षटकांत शमीने डॉमिनिक सिब्लीकला बाद करत इंग्लंडची अवस्था २ बाद १ अशी अवस्था केली. त्यानंतर ज्यो रुट आणि हमीद यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावा रचल्या. हमीदला बाद करत इशांतने इंग्लंडला तिसरा धक्का दिला.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एकाच षटकात मोईन अली (१३) आणि त्यानंतर आलेल्या सॅम करनला (०) धावावर बाद केले. अलीला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराटकरवी झेलबाद करत भारताला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर आलेल्या करनला सिराजने पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. भारताला आता विजयासाठी ३ विकेटची आवश्यकता आहे. . इंग्लंडच्या ४० षटकात ७ बाद ९४ धावा केल्या आहेत. इंग्लंडला अजून विजयासाठी १८ षटकात १७३ धावांची गरज आहे.

गोलंदाजीमध्ये इंग्रजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराह यांनी फलंदाजी नेत्रदीपक कामगिरी केली. दोघांनी नवव्या विकेटसाठी नाबाद ८९ धावांची भागिदारी संघाला सुस्थितीत नेले. शमीने कसलेल्या फलंदाजाप्रमाणे चौफेर फटकेबाजी करताना शानदार अर्धशतक ठोकले.

 दुसर्‍या डावात २५९ धावांची निर्णायक आघाडी घेतली आहे. दोघांनी ७७ धावांची भागीदारी केली. शमीने आपले कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. लंचपर्यंत भारताच्‍या १०८ षटकात ८ बाद २८६ धावा झाल्‍या आहेत. शमी ५२ तर बुमराह ३० धावांवर खेळत आहे. लंचनंतर  भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. भारताने ११० षटकात ८ बाद २९८ धावा केल्या. शमी ५६ तर बुमराह ३४ धावांवर नाबाद राहिला. दोघांनी आतापर्यंत नवव्या विकेटसाठी १२० चेंडूत ८९ धावांची भागिदारी केली.

शमी आणि बुमराहाच्‍या भागीदारीने इंग्‍लंड बॅकफूटवर

मोहम्‍मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या दमदार फलंदाजीमुळे लंचपर्यंत भारताने दुसर्‍या डावात २७१ धावांची निर्णायक आघाडी घेतली. शमीने सात वर्षानी कसोटी सामन्‍यात अर्धशतक फटकावले.

पाचव्‍या दिवसाचा खेळ सुरु झाल्‍यानंतर ऋषभ पंत २२ धावांवर बाद झाला. रॉबिनसन याच्‍या गोलंदाजीवर पंत झेलबाद झाला. यानंतर इशांत शर्माने २४ चेंडूवर १६ धावांवर बाद झाला. यानंतर मोहम्‍मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी केलेल्‍या भागीदारीमुळे भारताने २३० धावांची आघाडी घेतली.

कर्णधार ज्यो रूटच्या नाबाद १८० धावांच्या जोरावर इंग्लंडने दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात तिसर्‍या दिवसअखेरीस २७ धावांची नाममात्र आघाडी घेतली होती. त्यांचा पहिला डाव ३९१ धावांवर आटोपला.चौथ्‍या दिवशी भारताच्‍या सलामीवीरांनी संयमाने सुरुवात केली. मात्र दुसर्‍या डावात दुसर्‍या डावात भारताने सावध सुरुवात केली. मात्र भारताच्‍या सलामीवीरांनी निराशा केली.

केएल राहुल याला मार्क वूडने ५ धावांवर बाद केले. भारतला दुसरा धक्‍का बसला रोहित शर्मा हा २१ धावांची खेळी केली. पहिल्‍या डावाप्रमाणे रोहित खेळी करणार अशी सुरुवात झाली असताना मार्क वूडने त्‍याला तंबूची वाट दाखवली. यानंतर सॅम करनने कर्णधार विराट कोहली याला विकेटकीपर बटलरकडे झेल देणे भाग पाडले

चौथ्‍या दिवशीच्‍या पहिल्‍या सत्रात तीन बळी घेतल्‍याने इंग्‍लंडने निर्णायक आघाडी घेतल्‍याचे चित्र होते. अशा आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीत चेतेश्‍वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. दोघांनी १०० धावांची भागीदारी केली. मार्क वूडने पुजाराला ४५ धावांवर बाद केले. यानंतर अजिंक्‍य रहाणे (६१ धावा) आणि रवीद्र जडेजा यांना फिरकीपटू मोईन अलीने बाद केले.

Back to top button