Gold Price : सोने आणि चांदी दरात तेजी, जाणून घ्या १८ आणि २४ कॅरेटचा भाव | पुढारी

Gold Price : सोने आणि चांदी दरात तेजी, जाणून घ्या १८ आणि २४ कॅरेटचा भाव

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात सोमवारी सोने (Gold Price) आणि चांदी दरात तेजी दिसून आली. शुक्रवारच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याचा (Gold Price) दर ३३७ रुपयांनी वाढून ४७,०३९ (प्रति १० ग्रँम) रुपयांवर पोहोचला.

१३ ऑगस्ट रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६,७०२ रुपये होता. तर २३ कॅरेट सोन्याचा भाव ४६,५१५ रुपये होता. या दरात सोमवारी (दि.१६) सुधारणा झाली. हे दर आज अनुक्रमे प्रति १० ग्रँममागे ४७,०३९ आणि ४६,८५१ रुपयांवर पोहोचले. तर प्रतिकिलो चांदीचा दर ६३,०४७ रुपयांवर गेला आहे. १३ ऑगस्टला हा दर ६२,६१२ रुपये असा होता.

२२ कॅरेट सोन्याचा दर ४३,०८८ रुपये, १८ कॅरेट सोन्याचा दर ३५,२७९ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,५१८ रुपये एवढा आहे.
एकूणच सोन्याचा दर आज गेल्या आठवड्याच्या तुलनेत उच्च स्तरावर राहिला.

अमेरिकी डॉलरच्या मुल्यात घसरण झाल्याने सोने दराला झळाळी मिळाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. यामुळे भारत आणि चीन सारख्या देशांतून सोन्याला मागणी वाढली आहे.

इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी स्पॉट मार्केटमध्ये शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रँममागे ४६,७०२ रुपये एवढा होता. तर चांदीची प्रति किलो ६२,६१२ रुपये दराने विक्री झाली होती.

सोने आणि चांदी दरात गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. सोन्याचा दर ९५० रुपयांनी घसरला होता. तर चांदी तब्बल ४,१०० रुपयांनी स्वस्त झाली होती.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : दै. पुढारीने पूरग्रस्त वृत्तपत्र विक्रेत्यांना दिले जगण्याचे बळ

Back to top button