मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून गोपनियतेचा भंग, निवडणूक आयोगाने चौकशी करावी ; किरीट सोमय्या | पुढारी

मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून गोपनियतेचा भंग, निवडणूक आयोगाने चौकशी करावी ; किरीट सोमय्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुणीणी कुणाला मतदान केले हे अधिकृतपणे निवडणूक आयोगालाच माहीत असते. कोणत्या अपक्ष आमदाराने कुणाला मतदान केले हे निवडणूक आयोगाच सागू शकते. मग हे शिवसेनेच्या संजय राऊतांना कसे कळले? असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते किरीट सोमय्यांयींनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोपनियतेया भंग केला असून, निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणीही सोमय्या यांच्याकडून करण्यात आली आहे.

शिवसेनेचे संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या ६ अपक्ष/अन्य आमदारांची नावे जाहीर केली. हा गोपनीयतेचा भंग नाही का? निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाकडे लक्ष देण्याची विनंती  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, शिवसेनेकडून आता निवडणूकीतही माफियागिरी होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे सध्या घाबरले आहेत. कारण त्यांनी राज्यसभा निवडणूकीतील गोपनिय माहिती मिळवून निवडणूकीतील आचारसंहितेचा भंग केला आहे. भाजपला मतदान करणाऱ्या ६ अपक्ष/अन्य आमदारांची नावे राऊतांनी घोषित केली, ही नावं राऊतांकडे आलीच कुठून? याबबत निवडणूक आयोगाने चौकशी करावी, असेही सोमय्या म्हणाले.

Back to top button