राज्यसभा निवडणूक : फडणवीस यांच्या रणनितीने आम्ही जिंकलो : धनंजय महाडिक | पुढारी

राज्यसभा निवडणूक : फडणवीस यांच्या रणनितीने आम्ही जिंकलो : धनंजय महाडिक

पुढारी ऑनलान डेस्क : उमेदवारांबरोबरच नेत्यांचीही धाकधुक वाढविणार्‍या राज्यसभेच्या चुरशीच्या लढतीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली आणि कोल्हापूरला आणखी एक खासदार मिळाला. विजयानंतर माध्यमांशी बोलताना धनंजय महाडिक यांनी, “फडणवीस यांच्या रणनितीने आम्ही निवडणुकीत जिंकलो,” असल्याची प्रतिक्रिया दिली. (राज्यसभा निवडणूक 2022)

राज्यसभा निवडणूक निकाल : “आपला विश्वास मी निश्चितपणे सार्थ ठरवेन”

या विजयाचे श्रेय भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना देत धनंजय महाडिक यांनी ट्विट केले आहे की, “माझ्यावर विश्वास दाखवणारे माझे भाजपचे सर्व सहकारी, महाराष्ट्रातील विविध पक्षांचे आणि अपक्ष लोकप्रतिनिधी यांचा मी मनस्वी आभारी आहे. आपला विश्वास मी निश्चितपणे सार्थ ठरवेन.”

चुरशीची निवडणूक 

राज्यसभा निवडणूकीत कोल्हापूरचा खासदार कोण होणार? याकडे कोल्हापूरसह महाराष्ट्राच लक्ष वेधून राहिले होते. अखेर भाजपचे धनंजय महाडिक यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय पवार यांना चितपट करत विजयावर शिक्कामोर्तब केले. धनंजय महाडिक यांना ४१ मते मिळाली.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे ः पीयूष गोयल (48), अनिल बोंडे (48), प्रफुल्ल पटेल (43), इम्रान प्रतापगढी (44), संजय राऊत (42), धनंजय महाडिक (41). पहिल्या फेरीत संजय पवार यांना 33 तर धनंजय महाडिक यांना 27 मते मिळाली होती.
धनंजय महाडिक दुसर्‍या फेरीत विजयी झाले. त्यांना 41 मते, तर शिवसेनेच्या संजय पवार यांना 33 मते मिळाली.

हेही वाचलंत का?

Back to top button