पुणे : लग्नास नकार दिल्याने प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून  | पुढारी

पुणे : लग्नास नकार दिल्याने प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून 

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने प्रियकराचा ओढणीने गळा आवळून खून केला. चिंचवड येथे शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. पैगंबर गुलाब मुजावर (रा. एमआयडीसी भोसरी), असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने शनिवारी (दि. १४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार (२९ वर्षीय) तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती पैगंबर मुजावर व आरोपी महिला हे दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. त्यांचे सुमारे एक वर्षापासून अनैतिक संबंध होते.

पैगंबर हा भेटायला येत नाही तसेच लग्न करण्यास नकार देतो, या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, तरुणीने पैगंबर याला चिंचवड येथे लॉजवर भेटण्यास बोलावून घेतले. तेथे ओढणीने गळा आवळून त्याला जीवे ठार मारले.

पहा व्हिडिओ : पुण्याच्या निकीताने केला भरतनाट्यममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Back to top button