
पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉटसअप ग्रुप हा संवादासाठी अत्यंत सोयीचे असे माध्यम बनलं आहे. व्हॉटसग्रुपमध्ये २५६ इतक्याच सदस्यांना सहभागी करून घेता येत होते. पण व्हॉटसअप ग्रुपमध्ये आता ५१२ सदस्यांना सहभागी करून घेता येणार आहे (WhatsApp Group 512 Members). हे फिचर बेटा व्हर्जनसाठी उपलब्ध होते, पण आता हे सर्वंच व्हर्जनवर उपलब्ध केले जात आहे, अशी बातमी टाइम्स नाऊने दिली आहे.
कंपनीने व्हॉटसअपग्रुपमधील सदस्यांची संख्या वाढवण्यासाठीचे अपडेट उपलब्ध होईल, अशी घोषणा या वर्षी सुरुवातीलाच केली होती.
WABetaInfo ही वेबसाईट व्हॉटसअप संदर्भातील घडमोडींवर लक्ष ठेऊन असते. या वेबसाईटने ही बातमी सर्वप्रथम दिली आहे.
यापूर्वी व्हॉटसअपने २ जीबी पर्यंतच्या फाईल शेअर्स करण्याची सुविधा व्हॉटसअपच्या बेटा व्हर्जनला दिलेली आहे. त्यामुळे व्हॉटसअपवर चॅटिंगचा अनुभव अजून विस्तारणार आहे.
काही युर्जसना हे फिचर उपलब्ध होण्यासाठी २४ तासांचा अवधी लागू शकतो, असे या साईटने म्हटले आहे.
हेही वाचा