सोलापूर : पालकमंत्री भरणे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही : शिवसेना | पुढारी

सोलापूर : पालकमंत्री भरणे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही : शिवसेना

भाळवणी (सोलापूर) ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे यांनी सोलापुरात एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या व्यक्तव्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या बाबत पालकमंत्री भरणे यांनी काढलेले उद्गार हे निषेधार्ह असून अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे.

आज देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्शवभूमीवर सोलापुरात प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांनी वक्तव्य केले.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच पालकमंत्री भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित पत्रकारांसह सर्व प्रशासनातील अधिकारी आवाक झाले. या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप जिल्ह्यात सोशल मीडियावर फिरू लागताच जिल्हा शिवसेनेत संतापाची लाट उसळली.

पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले यापुढे पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही.

पालकमंत्र्यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त असून त्यांनी माफी मागावी असे जिल्हाप्रमुख शिंदे म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या बाबत पालकमंत्री यांनी काढलेले उद्गार हे निषेधार्ह आहे.

अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे.

Back to top button