आजचे राशिभविष्य (दिनांक ८ जून २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक ८ जून २०२२)

आजचे राशिभविष्य (दिनांक ८ जून २०२२)

राशिभविष्य

मेष- शत्रूवर विजय प्राप्त कराल. वाद-विवादात यश मिळेल. कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. आकांक्षा पूर्ण होतील. उन्नती होईल.

राशिभविष्य

वृषभ- लॉटरी-सट्टा यात नुकसान होईल. आरामाची गरज आहे. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. संयमाने वागावे लागेल.

राशिभविष्य

मिथुन-पूर्वार्ध लाभदायक. बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे. पेचप्रसंग निर्माण होतील. कौटुंबिक ताणतणावातून मनःस्ताप होण्याची शक्यता.

राशिभविष्य

कर्क- महत्त्वाची कामे उत्तरार्धात करावीत. छंद जपाल. यशाकडे वाटचाल कराल. मनासारख्या घटना घडतील. कला व खेळामध्ये यश संपादन कराल.

राशिभविष्य

सिंह- सकाळ आनंददायी असेल. जबाबदारी वाढेल. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. अनावश्यक खर्च होईल. वस्तू सांभाळून ठेवा. हरवण्याची शक्यता.

राशिभविष्य

कन्या- मनःस्वास्थ्य सांभाळा. आनंदी दिवस. प्रयत्नांना यश मिळेल. प्रसन्नता प्राप्त होईल. अतिथ्यात दिवस जाईल. आप्तेष्टांबरोबर खरेदी कराल.

राशिभविष्य

तूळ – कर्जदार तगादा लावतील. जामीन राहू नका. कशावरही डोळे झाकून सही करू नका. आर्थिक नुकसान व फसवणुकीची शक्यता.

 

राशिभविष्य

वृश्चिक – वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. मानसिक समाधान मिळेल. आपापसातील मतभेद मिटतील. आर्थिक विकास होईल.

राशिभविष्य

धनु – मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल. वेळेचे नियोजन आवश्यक आहे. प्रवासाचे योग संभवतात.

राशिभविष्य

मकर – मान-सन्मान होतील. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल.

राशिभविष्य

कुंभ – कुसंगतीमुळे नुकसान होण्याची शक्यता. कामांचा वेग मंदावेल. कामांमध्ये अडचणी येतील. मतभेद होतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.

राशिभविष्य

मीन- प्रवासाचे योग. जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल. प्रेमभाव निर्माण होईल.

Back to top button