केळीच्या पानावर जेवण वाढण्याचे 3 फायदे | पुढारी

केळीच्या पानावर जेवण वाढण्याचे 3 फायदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : केळीच्या पानावर जेवण वाढण्याची जुनी प्रथा आपल्याकडे आहे. विशेषतः दक्षिणेकडील राज्यांत ही परंपरा आजही टिकून आहे. श्रावणातही केळीच्या पानावर जेवण्याची प्रथा आहे.

हिरव्यागार केळीच्या पानावर सर्व्ह केलेले विविध शाकाहारी पदार्थ हे जिथं नेत्रसुखद असतं तितकचं ते आरोग्यदायीसुद्धा असतं.

श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपण जाणून घेऊ या केळीच्या पानावर जेवणाचे काही महत्त्वाचे फायदे.

१. पौष्टिक

केळीची पानांत विविध पौष्टिक घटक असतात. पॉलिफेनॉल्स नावाचे एक अँटिऑक्सिडंट केळीच्या पानांत मोठ्या प्रमाणावर असतं.

जेव्हा अन्नपदार्थ केळीच्या पानावर वाढले जातात, तेव्हा या पानातील अँटिऑक्सिडंट घटक अन्नात मिसळतात.

असं मानलं जातं की केळीच्या पानात अँटिबॅक्टिरयल घटकही असतात, त्यामुळे अन्नात काही जिवाणू असले तर ते मारले जातात.

२. आर्थिकदृष्ट्या परवडणारे

केळीची पान अगदी स्वस्तात असतात. धातूच्या प्लेटवर खर्च करण्यापेक्षा केळीचं पान कधीही स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे.

३. पर्यावरणदृष्ट्या ही उत्तम

सध्या बाजारात थर्माकोल, प्लास्टिक यांच्या वापरा आणि फेकून द्या अशा प्रकारच्या प्लेट उपलब्ध आहेत.

त्याचा वापरही भरपूर प्रमाणार होतो. पण अशा प्लेट पर्यावरणाला हानीकारक आहेत. हे लक्षातल घेतलं तर केळीची पानं हा नैसर्गिक पर्याय कधीही उत्तम होय.

४. स्वच्छ

धातूच्या, काचेच्या किंवा प्लास्टिकच्या ताट आणि वाट्या धुण्यासाठी साबणाचा वापर करावा लागतो.

कितीही प्रयत्न केला तरी या ताट आणि वाट्यांत साबणाचा काही अंश राहण्याची शक्यता असते आणि ते अन्नातून पोटात जाऊ शकते.

केळीच्या पानावर एक प्रकारची चकाकी असते, त्याचं कारण म्हणजे या पानांवर एक प्रकारचं नैसर्गिक कोटिंग असतं.

त्यामुळे केळीच्या पानावर धूळ बसत नाही. हा विचार केला तर केळीचं पान स्वच्छ ही आहे. त्यामुळे तुम्हाला कधी केळीच्या पानावर जेवण करण्याची संधी मिळाली तर संधी सोडू नका.

Back to top button