Kolhapur Accident : कोल्हापूर भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार, तिघे जखमी | पुढारी

Kolhapur Accident : कोल्हापूर भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार, तिघे जखमी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा

मित्रांसमवेत पार्टी करून कोल्हापूरकडे परतणाऱ्या तरुणांच्या मोटारीला कोल्हापूर जवळील पुईखडी घाटात भीषण अपघात होऊन दोन तरुण जागीच ठार झाले तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. शुभम हेमंत सोनार (24 राहणार राजारामपुरी )आणि शंतनु शिरीष कुलकर्णी (वय 28 राहणार मोरेवाडी तालुका करवीर) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

सौरभ रवींद्र कणसे (वय 26 राहणार पिंपळेश्वर गणपती मंदिराजवळ राजारामपुरी) कोल्हापूर संकेत बाळकृष्ण कडणे ( 21 राहणार खाडिलकर गल्ली सांगली) याच्यासह आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे

पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, शुभम सोनार शंतनू कुलकर्णीसह त्यांचे सहकारी मित्र शनिवारी रात्री उशिरा वाशी येथील फार्महाऊसवर पार्टीसाठी गेले होते. जेवण करून मध्यरात्रीच्या सुमाराला मोटारीतून कोल्हापूरकडे येत होते पुईखडी जवळील घाटात चालक शुभम सोनार याचा मोटारीवरील ताबा सुटला. भरधाव असलेली मोटार पुईखडी घाटालगत खोलवर खड्ड्यात आदळली त्यात शुभम सोनार व शंतनू कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला तर सौरभ कणसेसह अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले.

मध्यरात्री दीड ते पावणेदोनच्या सुमाराला ही घटना घडली. भरधाव वेगातील मोटार घाटानजिक खोलवर खड्ड्यात आदळल्याने मोठा आवाज झाला त्यामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ पोलिस आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले मध्यरात्री मृतदेह मोटारीतून बाहेर काढण्यात आले जखमीनाही तात्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :

 

Back to top button