सातारा अपघात : अनिकेत वडिलांचे न ऐकता गेला आणि जीव गमावला | पुढारी

सातारा अपघात : अनिकेत वडिलांचे न ऐकता गेला आणि जीव गमावला

 गौरव डोंगरे, कोल्हापूर: सातारा अपघात: मित्राचे लग्न ज्या दिवशी आहे तेव्हाच जा, एक दिवस आधी नको, असे वडील वारंवार सांगत होते. मात्र, अनिकेत आणि त्याच्या मित्रांनी ऐकले नाही आणि नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

सातारमधील पोवई नाका ते मानसी प्राईड हॉटेल दरम्यान न्यायालय इमारती अलीकडे ३० फूट ओढ्यामध्ये कार कोसळून कोल्‍हापुरातील अनिकेत कुलकर्णी व आदीत्‍य घाटगे या वर्गमित्रांचा दुर्दैवी मृत्‍यू झाला.

सातारा येथे मित्राच्‍या भावाचे लग्‍न असल्‍याने सर्व कोल्हापुरातील वर्गमित्रांनी जायचे ठरवले होते.
लग्‍न समारंभाआधी हळदी समारंभात दंगामस्‍ती आणि थोडे पर्यटनही करता येईल म्‍हणून आदल्‍या दिवशी जाण्‍याचा निर्णय पाच मित्रांनी घेतला.

अनिकेतचे वडील त्‍याला जाण्‍यापासून थांबवत होते. लग्‍नादिवशीच कोल्‍हापुरातून निघा असे वारंवार सांगत होते, असे ते सांगत होते. पण त्‍या पाच जणांनी जायचे निश्‍चित गेले. अखेर नियतीने वर्गमित्रांवर घाला घातलाच.

साताऱ्यात गेलेल्या कोल्हापूर येथील दोन तरुणांचा भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला ( सातारा अपघात ). ती कार ३० फूट खोल ओढ्यात कार गेल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनिकेत कुलकर्णी हा मंगळवार पेठेतील प्रसिद्ध अनेगा वडा सेंटरचे मालक राजेंद्र कुलकर्णी यांचा एकुलता मुलगा. अनिकेतनेही बारावीपर्यंतच्‍या शिक्षणानंतर हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करुन आता पुर्णवेळ वडीलांच्‍या व्‍यवसायात मदत करण्‍याचे ठरवले होते. गेल्‍या काही वर्षातच अनेगा वडा सेंटरच्‍या शिरोली, मंगळवार पेठ अशा ठिकाणी तीन शाखाही सुरू झाल्‍या होत्‍या.

मित्राच्या भावाचे लग्न

अनिकेत पन्‍हाळा येथील एका बोर्डिंग स्‍कूलमध्‍ये शिकण्‍यास होता. यावेळी त्‍याच्‍या वर्गात असणार्‍याच एका मित्राच्‍या भावाचे लग्‍न सातारा येथे होते.

या लग्‍नाला जाण्‍यासाठी त्‍याच्‍यासोबत आणखी चार मित्र तयार झाले. अनिकेतच्‍या मोटारीतून मंगळवारी दुपारी चार वाजता सातारा येथे गेले.

जेवण करून हॉटेलकडे परतत हाोते.  त्यावेळी रात्री एकच्या सुमारास मोटारीचा अपघात झाला.

यामध्‍ये अनिकेत कुलकर्णी, आदित्य प्रताप घाटगे (वय २३, रा. वाडकर गल्ली, कसबा बावडा) या दोघांचा जागीच मृत्‍यू झाला.

तर देवराज अण्णाप्पा माळी (वय २१ रा. कसबा बावडा) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.्‍

वर्गमित्रांची शेवटपर्यंत साथ…

अनिकेत व आदित्‍य हे पन्‍हाळा येथील बोर्डिंग स्‍कूलमध्‍ये एकत्रित शिकण्‍यास होते. बारावीपर्यंतच्‍या शिक्षणानंतर अनिकेतने हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतले होते.

तर आदित्य घाटगे हा डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कम्प्यूटर इंजिनीअरिंग च्या शेवटच्या वर्षात शिकत होता.

दोघांमधील मैत्री अखेरच्‍या श्‍वासापर्यंत टिकून राहिली अशी प्रतिक्रिया मित्रपरिवारातून व्‍यक्‍त होत होती.

अनिकेतने ऐकले असते तर….

अनिकेत आणि त्‍याचे मित्र मंगळवारी कोल्‍हापुरातून निघणार होते. तर अनिकेतचे वडील त्‍यांना लग्‍नाच्‍या दिवशी म्‍हणजे बुधवारीच निघा असे सांगत होते.

पण, मित्राने हळदी समारंभाला येण्‍याची विनंती केल्‍याने या सर्व मित्रांनी आदल्‍या दिवशीच जाण्‍याचे ठरवले होते.

अनिकेतचे वडीलांचे म्‍हणणे ऐकले असते तर कदाचित हा अपघात टळला असता अशी चर्चा नातेवाईकांमध्‍ये सुरु होती.

Back to top button