शंभर वर्षांपेक्षा जुन्या मशिदींचे गोपनीय सर्वेक्षण; सर्वोच्च न्यायालयात याचिका | पुढारी

शंभर वर्षांपेक्षा जुन्या मशिदींचे गोपनीय सर्वेक्षण; सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात सध्या सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत देशातील शंभर वर्षांहून अधिक जुन्या आणि प्रमुख मशिदींचे गोपनीय सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.

शंभर वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या प्रमुख मशिदींतील तलाव आणि विहिरी हलवण्याचे निर्देशही जनहित याचिकात मागितले आहेत. अशा मशिदींचे गोपनीय सर्वेक्षण केले जाऊ शकते जेणेकरुन तेथून काही अवशेष आढळल्यास अनावश्यक जातीय तणाव आणि धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार टाळता येतील, असे जनहित याचिकात म्हटले आहे. ही याचिका शुभम अवस्थी यांच्यावतीने विवेक नारायण शर्मा यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

गोपनीय सर्वेक्षण करून अहवाल सादर होईपर्यंत विवादित मालमत्ता कोणत्याही पक्षाकडून किंवा त्यांच्या हस्तक्षेपापासून मुक्त ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी सप्त ऋषी मिश्रा यांनी केली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिका 100 वर्षांहून अधिक जुन्या आणि महाभारत, रामायण, पुराण, वेद आणि उपनिषदांमध्ये असल्यामुळे वादात असलेल्या सर्व प्राचीन आणि प्रमुख मशिदींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रतिवादींना मागितले आहेत.

हेही वाचा  

Back to top button