Tsunami Warning :पूर्व तिमोरमध्ये भूकंप, हिंदी महासागरात त्सुनामीचा इशारा | पुढारी

Tsunami Warning :पूर्व तिमोरमध्ये भूकंप, हिंदी महासागरात त्सुनामीचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पूर्व तिमोर किनारपट्टीला भूंकपाचे शुक्रवारी धक्के बसले. यानंतर आता हिंद महासागरात त्सुनामी येईल अशी भीती व्यक्त केली जात असून तसा इशाराही देण्यात आला आहे. पूर्व तिमोरमध्ये झालेला भूकंप हा ६.४ रिश्टर इतका शक्तीशाली होता. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची, माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने अशी माहिती दिली आहे की, या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांचा परिणाम हा भारतीय दक्षिण किनारपट्टीवर देखील होऊ शकतो. या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांमुळे हिंदी महासागरात त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका न्यूज एजन्सीनुसार, हिंद महासागरात सुनामीचा इशारा जारी केला आहे.

हेही वाचा :

Back to top button