पुण्यात जेल अधिकार्‍याच्या मुलाचा निघृण खून; हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर येथील घटना | पुढारी

पुण्यात जेल अधिकार्‍याच्या मुलाचा निघृण खून; हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर येथील घटना

पुणे: पुढारी वृत्तसेवा

कारागृह अधिकार्‍याच्या मुलाला ग्लायडींग सेंटर येथे बोलवून घेत तेथे धार हत्यारांनी वार करून त्याचा निघृण खून करणार्‍या महिलेसह तिच्या चार साथीदारांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. गिरीधर उर्फ गिरीश उत्तरेश्वर गायकवाड (21, रा. गोपाळपट्टी, घुले पार्क साई टॉवर मांजरी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत गिरीधर यांचा मोठा भाऊ निखीलकुमार उत्तरेश्वर गायकवाड (27) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साक्षी पांचाळ व चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेला तरूण गिरीधर याचे वडील अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे जेलर म्हणून नोकरीस आहेत. त्यांचे मुळ गाव उरळीकांचन आहे. मंगळवारी (दि. 24) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांची पत्नी, आई आणि गिरीधर हे घरी बसले होते. त्यावेळी गिरीधर याला त्याच्या मोबाईलवर कोणाचातरी फोन आला. त्यावर फिर्यादी निखीलकुमार यांनी त्याला कोणाचा फोन आहे अशी विचारणा केली असता त्याने साक्षी पांचाळचे मॅटर आहे असे सांगितले. निखील यांनी काही विचारण्यापूर्वीच गिरीधर घरातून निघून गेला.

बारामतीत युवतीने कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये घेतला गळफास

अर्ध्यातासाहून अधिक काळ होेऊनही तो घरी न आल्याने त्याच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर एकदा त्याच्या फोनची रिंग वाजली आणि नंतर फोन स्विच ऑफ झाला. त्यानंतर गिरीधर यांच्या वडीलांनी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास निखील यांच्या आईच्या मोबाईलवर फोन करून गिरीधरचा खून झाल्याचे सांगितले, त्यावेळी त्याच्या वडीलांना आश्रू अनावर झाले होते. त्यानंतर पोलिसांनीही निखील यांना फोन करून ग्लायडींग सेंटर येथे खून झालेल्या ठिकाणी आईला आणि त्यांना बोलवून घेतले. घटनास्थळी पोहचल्यानंतर आईने मृत व्यक्ती ही गिरीधरच असल्याचे ओळखले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गिरीधर यांच्या छातीत तीन वेळा धारदार हत्याराने भोकसून त्याचा निघृण केल्याचे यावेळी दिसून आले.

अशी आली खुनाची घटना समोर

मंगळवारी रात्री रोजप्रमाणे जेवण झाल्यानंतर एक जण ग्लायडिंग सेंटर येथे फिरण्यास गेले होते. रात्री दहाच्या सुमारास ते शतपावली करत असताना त्यांना त्यांच्यासमोर 20 ते 25 वर्षाच्या मुलावर एक महिला आणि चार पुरूष धारदार हत्याराने वार करत असल्याचे त्यांना दिसले. गिरीधर असलेला तो मुलगा जोरजोरात वाचवा वाचवा म्हणून ओरडत होता. याचवेळी शतपावली करणार्‍या व्यक्तीला पाहून महिलेसह पाच जण सासवडच्या दिशने पळून गेले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना दिली.

धुळ्याच्या दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले ; मुलानेच आई व आजीचा खून केल्याचे स्पष्ट

म्हणून केला गिरीधरचा खून

खून झालेला तरुण गिरीधर आणि आरोपी साक्षी पांचाळ नावाची तरुणी हे दोघे कॉलेजचे मित्र आहे. साक्षीने तिच्या शाळेतील एका वर्गमित्रासोबत प्रेमवविवाह केला आहे. त्यानंतर गिरीधर आणि साक्षी दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान हा प्रकार साक्षीच्या पतीला कळला. त्यातून त्यांच्यात वाद झाले. त्याने साक्षीला गिरीधरच्या संपर्कात राहू नको असे सांगितले होते.

संजय पवार उद्या राज्‍यसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज : संजय राऊत

साक्षी ही काळेपडळ येथे तिच्या आई-वडिलांकडे आली होती. मंगळवारी रात्री साक्षी हिचा पती मद्यप्राशन करून काळेपडळ येथे आला होता. त्याने साक्षीला गिरीधरला फोन करून बोलावून घेण्यास सांगितले. त्यानुसार साक्षीने ग्लॉयडिंग सेंटर येथे गिरीधरला रात्री साडेदहाच्या सुमारास बोलावून घेतले. तेथे त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी साक्षीच्या पतीने व त्याच्या साथीदारांनी चाकूने पोटात भोसकून गिरीधरला गंभीर जखमी केले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढळा होता. रात्रभर पोलिसांनी परिसर पिंजून तरुणी व तिचा भाऊ अशा दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Back to top button