सांगली : किरकोळ वादातून गुंडाचा खून | पुढारी

सांगली : किरकोळ वादातून गुंडाचा खून

सांगली ; पुढारी वृत्तसेवा
येथील संजयनगरमधील गुंड तुकाराम सुभाष मोटे (२७) याचा किरकोळ वादातून चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२५) मध्यरात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयिताना ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी, मोटे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. महिन्यापूर्वी परिसरातील पेट्रोलपंपावर उधार पेट्रोल दिले नाही, म्हणून त्याने महिला कर्मचार्‍याचा विनयभंग करुन मारहाण केली होती. तसेच पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर मुक्त होता.

मंगळवारी रात्री संजयनगर परिसरातील तरुणांकडे बघण्यावरुन वाद झाला. त्यातून त्यांच्यामध्‍ये हाणामारी झाली. मोटे याला चाकूने भोसकण्यात आले. तीन ठिकाणी खोलवर वार झाल्यामुळे त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला . काही वेळातच संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले आहे. खुनाच्या नेमक्या कारणाबाबत तपास सुरु आहे.

हेही वाचा : 

Back to top button