‘विग’खाली टक्कल लपवणे नवरदेवाला पडले महागात, खावी लागली नवरीची लाथ! | पुढारी

'विग’खाली टक्कल लपवणे नवरदेवाला पडले महागात, खावी लागली नवरीची लाथ!

उन्‍नाव : वृत्तसंस्था

डोक्यावर पडलेले आणि ‘विगे’खाली लपविलेले टक्‍कल नवरदेवाला महाग पडले. ऐन मंडपात चक्‍कर आली, नवरदेव पडला, विग एकीकडे, उघड झालेल्या टकलासह नवरदेव एकीकडे… नवरदेवाला टक्‍कल आहे, हे लक्षात येताच नवरीने मांडवातच तांडव सुरू केले. अखेर नवरदेवाला नवरी तर गमवावी लागलीच, वरून माहिती दडविल्याच्या गुन्ह्याखाली 5 लाख 66 हजार रुपयांचा भुर्दंड बसला तो वेगळा!!

उत्तर प्रदेशातील उन्‍नाव जिल्ह्यात हा एक गहजब झाला. विवाहाचे निम्मे विधी पार पडलेले होते अन् नवर्‍या मुलाला लग्‍नमंडपात अचानक चक्‍कर आली. तो पडला. डोक्यावरचे विग उडाले. आपला होणारा नवरा टकला आहे, ही कल्पनाच नवरीला सहन झाली नाही. पडलेल्या नवरदेवाला आधार देऊन उठवणे सोडाच… टक्‍कल पाहून तिने त्याला लात घातलीच होती; पण एका समजूतदार बाईने तिला आवरले. पाहुण्यारावळ्यांसमोरच प्रचंड संतापात तिने ‘ये शादी नहीं हो सकती,’ असे सांगितले. नंतर प्रकरण पोलिसांत गेले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button