कर्जतमघील वाड्यात आढळली जुनी नाणी..! जेेसीबी चालक, कामगार अवाक; तालुक्यात चर्चेला आले उधाण | पुढारी

कर्जतमघील वाड्यात आढळली जुनी नाणी..! जेेसीबी चालक, कामगार अवाक; तालुक्यात चर्चेला आले उधाण

कर्जत : पुढारी वृत्तसेवा

कर्जत तालुक्यातील शिंदे येथे जेसीबीने जुने घर पाडताना शंभर वर्षांपूर्वीची धातूची नाणी आढळून आली. सुरेश हरकचंद भंडारी यांच्या मालकीच्या जुन्या वाड्याची इमारत खाली करण्याचे काम सुरू असताना जेसीबी चालक व कामगारांना ही नाणी आढळून आली. यानंतर महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली.

दोनशे मुलींची शाळा सुटली! जिल्हा परिषदेच्या शाळाबाह्य सर्वेक्षणातील धक्कादायक माहिती

कर्जत तालुक्यातील शिंदे येथे बांधकामासाठी जुन्या घराचे खोदकाम जेसीबीद्वारे सुरू होते. त्यावेळी नाणी वाजल्याचा आवाज झाला. तेथे पाहिले असता एक छोटी चरवी आढळून आली. त्यामध्ये 1918, 1919 सालातील भारतीय चलनातील पाच नाणी आढळून आली. ही माहिती समजताच शिंदे गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. नाणी पाहण्यासाठी आणि छायाचित्रे घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. याची माहिती पोलिस प्रशासनाला कळविण्यात आली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिली. त्यानंतर पोलिस व महसूल विभागाचे सर्व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. वास्तविक पाहता याठिकाणी अवघी पाच आणि शंभर वर्षांपूर्वीची साधी नाणी सापडली.

शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय पवारच! संजय राऊतांची घोषणा

शंभर वर्षांपूर्वीची नाणी

खोदकाम करताना जेसीपी चालक व कामगारांना मोठे घबाड सापडल्याच्या अफवांना उधाण आले होते. प्रशासनाने पत्रकारांना सांगितले की, अवघी पाच नाणी या ठिकाणी सापडली आहेत. त्यापेक्षा दुसरे काही नाही आणि ही नाणी देखील भारतीय चलनाची आणि शंभर वर्षांपूर्वीची आहेत. त्यामुळे गुप्त वगैरे असे काही नाही, असे सांगितले.

Back to top button