कामशेत बोगद्यात अपघात: अर्धा तास 'एक्सप्रेस वे' ची वाहतूक ठप्प, एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा | पुढारी

कामशेत बोगद्यात अपघात: अर्धा तास 'एक्सप्रेस वे' ची वाहतूक ठप्प, एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील कामशेत बोगद्यात शनिवारी दुपारी एका खासगी बसचा टायर फुटल्याने अपघात झाला. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक अर्धा तास थांबविण्यात आली होती. त्यामुळे कामशेत बोगद्यापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पालघर : खेळताना गच्चीवरुन पडल्‍याने चिमुरडीचा मृत्यू

शनिवार, रविवार विकेंडमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडतात. त्यातच शनिवारी (दि.21) रोजी पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील कामशेत बोगद्यात एका खासगी बसचा टायर फुटला अन बसचा अपघात झाला. यावेळी अनेक वाहनांचे नुकसान झाले. मात्र, कोणतीही जिवीत हानी झाली नाही. महामार्ग पोलिस आणि आयआरबी पथकाच्या सहाय्याने अर्धा तास क्रेनच्या माध्यमातून अपघात स्थळावरील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यावेळी महामार्ग पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, तात्काळ वाहतूक थांबविली. सुमारे अर्ध्या तासानंतर रस्ता रिकामा झाल्यावर वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु, तोपर्यंत भर उन्हात प्रवाशांना रस्त्यातच उभे राहावे लागले.

Back to top button