कवठेमहांकाळ : शिरढोणमधील बँकेचे एटीएम मशिन चोरट्यांनी पळवले | पुढारी

कवठेमहांकाळ : शिरढोणमधील बँकेचे एटीएम मशिन चोरट्यांनी पळवले

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा; रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे अज्ञात चोरट्यांनी एका बँकेचे एटीएम मशिन पळवले आहे. ही घटना शनिवारी (दि.२१) सकाळी उघडकीस आली. ही घटना शुक्रवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचे समजत आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याचेही समजते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.

श्वान पथकाच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अज्ञात चोरट्याचा कवठेमहांकाळ पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दूबुले, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट देत पुढील तपासाचे आदेश दिले आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button