नातेवाईक म्हणायचे; शॉर्ट्स मत पहनो...पण 'ती'च आज बनली ‘वर्ल्ड चॅम्पियन’, वाचा निखत झरीनच्या संघर्षाची कहाणी | पुढारी

नातेवाईक म्हणायचे; शॉर्ट्स मत पहनो...पण 'ती'च आज बनली ‘वर्ल्ड चॅम्पियन’, वाचा निखत झरीनच्या संघर्षाची कहाणी

पुढारी ऑनलाईन डेस्क :

शॉर्ट्स मत पहनो…, ये मत करो..,वो मत करो…असे म्हणणाऱ्या नातेवाईकांना बॉक्सर वर्ल्ड चॅम्पियन बनून निखत झरीनने उत्तर दिले आहे. “जवळचे नातेवाईक म्हणत होते, “मुलीने असे खेळ खेळू नयेत, ज्यात तिला शॉर्ट्स घालावी लागते”. पण आज तीच मुलगी (निखत झरीन ) वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे.

भारताची निखत झरीन ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनली आहे. निखतने थायलंडच्या जितपाँग ज्युत्मासला 5-0 असे नमवून इतिहास घडवला. तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे सुरू असलेल्या महिला वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेतील 52 किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक पटकावले. निखत हिने खांद्याच्या मोठ्या दुखापतीवर मात करत जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली आहे.  या स्पर्धेतील भारताचे हे महिला गटातील एकूण 10 वे सुवर्णपदक ठरले. मागील 14 वर्षांत मेरी कोमनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय बॉक्सर ठरली आहे.

Boxing Nikhat Zareen Won Gold Medal In Women World Boxing Championship - Boxing: निकहत जरीन ने इस्तांबुल में लहराया तिरंगा, महिला विश्व बॉक्सिंग चैंपियनशिप में जीता स्वर्ण ...

निखतच्या बॉक्सर बनण्याची कहाणीही अशीच काही रंजक आहे. निखत झरीनचे वडील मोहम्मद जमील स्वतः फुटबॉल आणि क्रिकेट खेळायचे. त्यांना त्यांच्या ४ मुलींपैकी एकीला खेळाडू बनवायचे होते. त्यांच्या तिसऱ्या क्रमांकाची मुलगी निखतसाठी त्यांनी अॅथलेटिक्सची निवड केली. लहान वयातच राज्य चॅम्पियन बनलेल्या निखतनेही आपल्या वडिलांचा हा निर्णय योग्य असल्याचे प्रत्येकवेळी सिद्ध केले. पण, काकांच्या सांगण्यावरून निखतने बॉक्सिंग रिंगमध्ये प्रवेश केला आणि वयाच्या १४ व्या वर्षी ती वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चॅम्पियन बनली. त्यानंतर तिने एकामागून एक यशाच्या शिडी चढवल्या. नुकतेच तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. तिच्या खेळाडू म्हणून सुरू असलेल्या प्रवासातील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.

भारतीय महिला बॉक्सरमध्ये एमसी मेरी कोम ही सहावेळा विश्वविजेती ठरली आहे. पण या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकवत निकतने या यादीत आपले नाव कोरले आहे. पण या यशासाठी तिला अफाट कष्ट आणि बराच काळ वाट पहावी लागली आहे. २०१७ मध्ये खांद्याच्या दुखापतीमुले निकत स्पर्धेत सहभागी होऊ शकली नव्हती. पण ५ वर्षानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील या ऐतिहासिक कामगिरीने या प्रवासातील दु:ख, वेदना सर्वकाही बोथट झाल्या आहेत.

हा विजय भारतातील प्रत्येक मुलीला प्रेरणा देईल : मोहम्मद जमील (वडील)

निखतचे वडील मोहम्मद जमील यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले की, “जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे ही अशी गोष्ट आहे जी मुस्लिम मुलींना तसेच देशातील प्रत्येक मुलीला आयुष्यात मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रेरित करेल. निखतने स्वतःचा मार्ग स्वतःच कोरला आहे.”

मला आज आठवतंय…जेव्हा निखतने बॉक्सर बनण्याच्या इच्छेबद्दल सांगितलं, तेव्हा आम्हाला कुठलाही संकोच वाटला नाही. पण, कधी कधी नातेवाईक किंवा मित्रमंडळी म्हणायचे की, ” मुलीने असे खेळ खेळू नयेत, ज्यात तिला शॉर्ट्स घालावी लागते”. पण आम्हाला माहीत होतं की, निकतला काहीही करायचं असेल आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच तिच्या पाठीशी उभे राहू. यामुळेच आज ती वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे.

अखेर निकत बनली वर्ल्ड चॅम्पियन

राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी निकतला ५ वर्षे वाट पाहावी लागली. २०१६ मध्ये फ्लायवेट प्रकारात ती प्रथमच वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन बनली. लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती मेरी कोमही याच वजन गटात होती. अशा परिस्थितीत वरिष्ठ पातळीवर आपले स्थान निर्माण करणे निखत यांना सोपे नव्हते, तरीही तिने राष्ट्रीय स्थरावर आपले स्थान निर्माण केले. २०१८ मध्ये, तिने नॅशनलमध्ये सिनियर गटात कांस्यपदक जिंकले आणि त्याच बेलग्रेडमध्ये महत्त्वपूर्ण विजेतेपद जिंकले. २०१९ च्या आशियाई चॅम्पियनशिप आणि थायलंड ओपनमध्ये पदक जिंकून वरिष्ठ स्तरावर खेळण्याचा निखतने दावा केला होता, मात्र ५२ किलो वजनी गटात मेरी कोमच्या उपस्थितीमुळे निखतला संधी मिळत नाही. २०१८ च्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिला स्थान मिळाले नसल्याने ती निराश झाली होती, पण वडिलांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. अखेर निखत जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन बनली.

हेही वाचलत का?

Back to top button