सोलापूर : आषाढी वारीत 16 लाख वारकरी सहभागी होणार | पुढारी

सोलापूर : आषाढी वारीत 16 लाख वारकरी सहभागी होणार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
कोरोना निर्बंध हटविल्याने यंदाच्या आषाढी वारीत किमान 15 ते 16 लाख वारकरी सामील होण्याची शक्यता आहे. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने किमान तीन लाख भाविक यंदा वाढतील, असा प्रशासनाचा अंदाज असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

ते म्हणाले, आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजनाच्या बैठका घेण्यात येत आहेत. वारकर्‍यांना किमान मूलभूत सुविधा पुरवून त्यांची वारी सुखद करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. आषाढी वारीत आतापर्यंत 7 प्रमुख पालख्यांसमवेत वारकरी पंढरपूरला पायी चालत येतात. यंदाच्या वर्षी 9 प्रमुख पालख्यांसमवेत वारकरी पंढरपूरला
आषाढी वारीसाठी येत आहेत.

यंदाच्या वारीत श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण, श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्‍वर, श्री चांगावटेश्‍वर देवस्थान, सासवड, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, सासवड, श्री संत मुक्‍ताबाई संस्थान, मुक्‍ताईनगर, श्री विठ्ठल रुक्माई संस्थान, कोंडण्यपूर, श्री संत तुकाराम महाराज संस्थान,देहू, श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान, आळंदी, श्री संत नामदेव महाराज संस्थान, पंढरपूर, श्री संत निळोबाराय संस्थान, पिंपळनेर या पालख्या आषाढी वारीसाठी येत आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button