Geranium Farming : ऊसशेतीला फाटा देत 'या' शेतकऱ्याने फुलवली जिरेनियम शेती, वाचा लागवड ते काढणी पर्यंतची संपूर्ण माहिती | पुढारी

Geranium Farming : ऊसशेतीला फाटा देत 'या' शेतकऱ्याने फुलवली जिरेनियम शेती, वाचा लागवड ते काढणी पर्यंतची संपूर्ण माहिती

आंबेवडगाव; विठ्ठल वाघमोडे : आंबेवडगाव धारुर तालुक्यातील आसरडोह येथील शेतकरी (ग्राम रोजगार सेवक) वसंत देशमुख यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत जिरेनियमची शेती (Geranium Farming) केली आहे. आपण काहीतरी नवीन प्रयोग करावा या उद्देशाने त्यांनी एक ते दोन एकरमध्ये जिरेनियमची लागवड केली. पोकरा योजनेअंतर्गत (POCRA – Project on climate resilient agricultural – हवामान अनुकूल कृषी प्रकल्प योजना) स्वतःच्या शेतात ही लागवड केली. इतर शेतकऱ्यांनीही जिरेनियमची शेती करावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.

 Geranium Farming : पिकाची कापणी वर्षातून तीनवेळा 

एका रोपाची किंमत नर्सरीमध्ये पाच रुपये असून, एक एकरसाठी साठ हजार रुपयाची रोपे लागतात. या पिकाची कापणी वर्षातून तीन वेळा केली जाते. एका झाडाला दोन ते अडीच किलो पाला निघतो. या पाल्यापासून कारखान्यामध्ये तेल काढले जाते. या तेलापासून वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम, सेंट, अत्तर, सुवासिक तेल बनवले जाते. याची विक्री कारखानदार थेट शेतातून करतात. त्यामुळे विक्रीसाठी येणारी अडचण शेतकऱ्याला येत नाही. याचा भाव जवळ-जवळ पाचशे ते सहाशे रुपये  क्विंंटल आहे. या शेतीसाठी लागणारा खर्च कमी असून, याला जास्त प्रमाणात खत किंवा फवारणी करण्याची आवश्यकता नाही. हे पिक गवतासारखे असून; पाणी असले की भरपूर प्रमाणात वाढते. वर्षाकाठी याच्या तीन छाटण्या केल्या जातात. जिरेनियमची रोपे एकदा लावली की ती पाच वर्षे राहतात. परत पाच वर्षानंतर दुसरी  लागवड करावी लागते.

कमी खर्चामध्ये शेती

Geranium Farming इतर शेतकऱ्यांनीही जिरेनियमची शेती करावी आणि भरघोस उत्पादन घ्यावे. कमी खर्चामध्ये परवडणारी ही शेती असून, याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जिरेनियमची लागवड करावी आणि ऊसापासून आपली सुटका करून घ्यावी. असा सल्ला वसंत देशमुख यांनी सल्ला दिला. ऊस हे पीक बारमाही असून परावलंबी झालेले आहे. इथे कारखानदारांची मनमानी चालते. त्यामुळे शेतकऱ्याला कोणताही पर्याय उरलेला नाही. कारखान्याने जर ऊस  गाळपासाठी नेला नाही तर, तो शेतात तसाच ठेवावा लागतो. ऊस तोडणीसाठी मजूरही मिळत नाही. एवढा ऊस कुठे घालणार हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. सध्या उसाचे क्षेत्र भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे या भागामध्ये कारखाने कमी कॅपिसिटीची असल्यामुळे ऊसाचे गाळप यावर्षी पूर्ण होणार की नाही? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. या समस्येतून सुटका होण्यासाठी शेतकऱ्यांनी जिरेनियम शेती, फुलशेती, फळशेती असे वेगवेगळे प्रयोग  करावेत असे शेतकरी वसंत देशमुख यांनी सल्ला.

हेही वाचलंत का?

यावर कोणत्याही प्रकारचा रोग पडत नाही. याला कोणताच प्राणी, पक्षी खात नाही. रात्री राखण करण्याची गरज भासत नाही. एकरी दोन लाख रुपये वार्षिक उत्पादन खर्चवजा शिल्लक राहते. (वसंत देशमुख)

शेतकऱ्यांनी आधुनिक प्रकारची शेती करत असताना, जास्त पाणी लागणारी पिके घेऊ नये. उदा. ऊस, केळी ही पिके टाळावित.समाधान वाघमोडे (मंडळ कृषी अधिकारी, धारूर)

Back to top button