Mobile : मोबाईलची बॅटरी लाईफ कशी वाढवाल? या ट्रिक्स वापरा ! | पुढारी

Mobile : मोबाईलची बॅटरी लाईफ कशी वाढवाल? या ट्रिक्स वापरा !

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोबाईलच्या (Mobile) फिचर्समध्ये कंपन्यांकडून वेगवेगळे बदल केले जात आहेत. स्मार्टफोन कंपन्यांनी कॅमेरा आणि बॅटरीवर लक्ष केंद्रीत करत आहेत. 5000mAh बॅटरी आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण, सध्या एंड्राॅयड आणि आयफोन मोबाईल वापरकर्त्यांना बॅटरी लाईफबद्दल मोठी अडचण निर्माण झाली आहे. आज आपण मोबाईल बॅटरी लाईफ कशी वाढवायची, याच्या ट्रिक्स जाणून घेणार आहोत.

चार्जिंग करण्याची पद्धत बदला : पहिल्यांदा स्मार्टफोनला चार्ज कसं करायचं, याबद्दल जाणून घ्या. बहुतांश लोक आपल्या स्मार्टफोनला बॅटरी संपल्यांनंतर चार्ज करतात. तर, काही लोक आपल्या स्मार्टफोनला रात्रभर चार्जिंग लावून ठेवतात. या सवयी पहिल्यांदा बदलायला हव्या. जेव्हा फोनची बॅटरी 50 टक्क्यांवर आलेली असते, तेव्हा फोन चार्जिंगला लावले योग्य असते. त्याशिवाय आपला फोन कधीही 100 टक्के जार्ज करू नये.

mobile

बॅटरी सेव्हिंग मोड : एंड्राॅयडमध्ये फिचर बॅटरी सेव्हिंग मोड आणि आयफोनमध्ये लो-पावर मोड, नावाचे पर्याय असतात. हे पर्याय बॅकग्राऊंडमध्ये चालणाऱ्या अ‍ॅप्सना बंद करते. यातून आपल्या फोनमढील बॅटरीचं आरोग्य व्यवस्थित राहतं. बॅटरी सेव्हिंग मोडचा वापर तेव्हा करा, जेव्हा तुमच्या फोनमध्ये 15-20 टक्के बॅटरी शिल्लक असते, त्यावेळी करा. तसेच जेव्हा चार्जिंगची व्यवस्था नसते, तेव्हा हा पर्याय वापरा.

हे फिचर्स बंद करून ठेवा : बॅटरीची लाईफ वाढवायची असेल, तर ऑटो-ब्राइटनेस सेटिंगला ऑन करून ठेवा. त्याशिवाय फोनचा Wi-fi आणि Location वापर नसेल, तर ऑफ करून ठेवा. नेटवर्क सर्च करण्यासाठी हे फिचर्स मोबाईलची (Mobile) बॅटरी सतत खर्च करत असतात. याशिवाय बॅकग्राऊंडमध्ये चालू असलेले अ‍ॅप्स बंद करायला हवेत.

whatsapp

डार्क मोड वापरा : सध्या बहुतांशी स्मार्टफोन आणि अ‍ॅप्समध्ये डार्क मोडचं फिचर आलेलं आहे. डार्क मोडचा वापर केल्यामुळे बॅटरी कमी वापरली जाते. कमीतकमी व्हाॅट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राममधील तरी डार्क मोड ऑन करून ठेवा. कारण, हे दोन्ही अ‍ॅप्स जास्त बॅटरी खर्च करतात.

पहा व्हिडीओ : पुढारी एज्युदिशा वेबिनार – श्री. विश्वास नांगरे – पाटील (जॉईंट सी. पी. लॉ एंड ऑर्डर, मुंबई)

हे वाचलंत का? 

Back to top button