चर्चा तर होणारचं...! पिकांचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकर्‍यानं लढवली अनाेखी शक्‍कल | पुढारी

चर्चा तर होणारचं...! पिकांचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकर्‍यानं लढवली अनाेखी शक्‍कल

पुढारी ऑनलाईन डेस्क : दररोज काही ना काही तुम्हाला व्हायरल झालेलं पाहायला, ऐकायला मिळते. सोशल मीडियामूळे तर क्षणार्धात एखादी गोष्ट व्हायरल होताना दिसते. असाच एक व्हिडिओ (अनाेखी शक्‍कल) सोशल मीडियावर व्हायरल होताना  दिसत आहे. तर हा व्हिडिओ एका शेतकऱ्याने बनवलेल्या हटके मशिनचा आहे. चला तर मग पाहूया नेमकं  काय आहे त्या व्हिडिओमध्ये. (Viral video)

शेतकर्‍याची अनाेखी शक्‍कल

शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त झालेला आपण पाहतो. मग ती आर्थिक अडचण असो वा नैसर्गिक समस्या असो. शेतकऱ्याला शेतात पीक घेण्यापासून ते पीक घरात येईपर्यंत त्याला बरेच कष्ट घ्यावे लागतात. या दरम्यान त्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील एक समस्या म्हणजे पिकांच पक्ष्यांकडून होणार नुकसान. पीक पेरणी, पीक उगवल्यानंतर, पीक काढणी दरम्यान पक्षी पिकांचं अतोनात नुकसान करत असतात. काही शेतकरी बरेच उपाय करत असतात. पण जुगाड करण्यात काही लोक माहीर असतात. कमीत-कमी वस्तूत आणि खर्चात, आपल्या घरातील उपलब्ध साधनांतून असं काही बनवतो की त्याला अत्याधूनिक तंत्रज्ञानही मागे पडेल. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये पक्षांना हकलवून लावण्यासाठी एका शेतकऱ्याने असाच एक जूगाड केला आहे.

काय आहे नेमक यंत्र 

व्हिडिओमध्ये एका लाकडी फळीला लावलेला टिनचा छोटा पंखा फिरताना दिसत आहे. (अनाेखी शक्‍कल) त्या पंख्यालाच तारेला धातूचा छोटा गोळा बांधलेला आहे. तो गोळा स्पर्श होईल अशा अंतरावर एक भांड उलट करुन जोडण्यात आले आहे. जस-जसे वारे येईल तस-तसे पंखा वेगाने फिरत आहे. त्याच गतीने तो लोखंडी गोळाही त्या भांड्याला स्पर्श होवून जात आहे. त्यामुळे टनटन असा आवाज येत आहे. या आवाजाने पिकावरील पक्षी उडुन जात आहेत. त्याचा या जूगाडाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होत आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरच्या ‘techzexpress’ या अकाऊंटवरून शेअर केला आहे. युझर्सकडून या व्हिडिओला पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Techzexpress (@techzexpress)

हेही वाचलंत का?

Back to top button