नवनीत राणा, "औरंगजेबाचे दर्शन घेणाऱ्यांचे दात तोडून दाखवा; तेव्हाच तुमच्यात..." - पुढारी

नवनीत राणा, "औरंगजेबाचे दर्शन घेणाऱ्यांचे दात तोडून दाखवा; तेव्हाच तुमच्यात..."

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण आणि पक्षातील इतर कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यातून राज्यात नवा वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, “हनुमान चालिसाचं पठण करणे हा राजद्रोह आहे, तर औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करणाऱ्यांना काय म्हणाल”, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.

नवनीत राणा म्हणाल्या की, “उद्धव ठाकरेंच्या नावाने आलेले महाराष्ट्रावरचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी हनुमान मंदिरात आरती करणार आहोत. त्यांनी मला वज्र द्या मी दात तोडण्याचे काम करेन असे सांगितले आहे. माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचे दात तोडण्याची गरज नाही. जर दात तोडायचे असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले अर्पण करणाऱ्यांचे तोडून दाखवा. तेव्हाच तुमच्यात हिंदुत्व जिवंत आहे, यावर आमचा विश्वास बसेल”, असेही राणा म्हणाल्या.

“आज संभाजी महाराजांची जयंती आहे. त्याचवेळी त्यांच्याविरोधात असणाऱ्यांना हार अर्पण केले जात असतील तर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री कुठे गेले हा माझा प्रश्न आहे. हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे तर कबरीवर फुले अर्पण करण्याला काय म्हणाल”, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.

पहा व्हिडीओ : संभाजीराजेंनी केली नव्या संघटनेची घोषणा | युवराज संभाजीराजे छत्रपती

हे वाचलंत का? 

Back to top button