Shocking News : पतीच्या आळशीपणाला वैतागली पत्नी! शरीराचे तुकडे करून मांस कढईत शिजविले  | पुढारी

Shocking News : पतीच्या आळशीपणाला वैतागली पत्नी! शरीराचे तुकडे करून मांस कढईत शिजविले 

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावर अशा काही बातम्या येतात, त्या वाचून तुमची झोपच उडते. काही बातम्या तर लोकांच्यावर मानसिक परिणाम करतात. आता अशीच एक बातमी समोर आली आहे की, एका महिलेने आपल्या आळशी पतीला वैतागून टोकाचं पाऊल उचललं आहे, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही.

नुकतीच एक बातमी समोर आली आहे की, एका पत्नीने आपल्या आळशी आणि कामचोर पतीला वैतागून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करून एका कढईमध्ये उकळविले. या महिलेचे नाव टेरेसा आहे. टेरेसा ही आपल्या पतीच्या आळशीपणाला वैतागली होती. टेरेसाने पतीला पहिल्यांदा ड्रग्ज देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर त्याची हत्या केली.

पतीची हत्या करून टेरेसाचा राग कमी झाला नाही. त्यानंतरही तिने जे काय केले ते ऐकून तुमची झोपच उडेल. पहिल्यांदा पतीची हत्या केली. त्यानंतर शरीराचे छोटे-छोटे तुकडे केले. पुन्हा तेच तुकडे एका कढईमध्ये उकळविले. ही घटना सर्बिया जरंजनीन शहरातील आहे. १० मे रोजी रात्री ९ वाजता ही भयंकर घटना घडली.

या घटनेत रात्री जेवण बनविताना चिढलेल्या महिलेने पतीचा जीव घेतला. टेरेसाने जेव्हा आपल्या पतीची हत्या केली, तेव्हा तिची मुलगीदेखील उपस्थित होती. तिने आपल्या आईच्या विरोधात साक्ष दिलेली आहे. डी एल्जे नावाने त्या मुलीची ओळख झाली आहे. ती टेरेसाच्या पहिल्या पतीची मुलगी आहे. मुलीने सांगितले की, तिचा सावत्र वडील हत्या होत असताना नशेत होता.

पण, त्यानंतरही त्यांना धोक्याची जाणीव होती. तेव्हा ते आपला जीव वाचविण्यासाठी पळून जात होते. पण, तिच्या आईने चाकू घेऊन पतीच्या शरीरावर एकसारखी वार केले. सध्या टेरेसा पोलिसांच्या ताब्यात आहे. टेरेसाने पोलिसांना सांगितले की, “मी माझ्या पतीच्या आळशीपणाला वैतागले होते. तो घरातील कामात मदत करत नव्हता. त्यामुळे वारंवार आमच्यात भांडणं होत होती.”

पहा व्हिडीओ : 2 वर्षात भोंगे, जेम्स लेन आठवावा असं काहीच घडलं नव्हतं

Back to top button