महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट; संजय राऊतांचा सोमय्यांवर आरोप | पुढारी

महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट; संजय राऊतांचा सोमय्यांवर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : “ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआयची चौकशी सुरू आहे, अशा कंपन्यांकडून सोमय्या देणग्या घेतात. युवक प्रतिष्ठानच्या खात्यात संशयास्पद देणग्या आहेत. मेट्रो डेअरीची ईडीची चौकशी सुरू आहे. याच कंपन्यांकडून किरीट सोमय्यांनाच कशी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या येतात? असे हे सोमय्या भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राची भाषा करतात. पण, जोपर्यंत भाजपामध्ये अशी माणसं आहेत, तोपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होणार नाहीत”, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केली.

“युवक प्रतिष्ठानच्या खात्यात ५० कंपन्या आणि १५० बिल्डरांकडून पैसे येत आहेत. भ्रष्टाचार संपवायला निघालेलाच सर्वात भ्रष्ट आहे. लोकांना धमक्या देऊन सोमय्या पैसे घेत आहेत. ईडी आणि सीबीआयने किरीट सोमय्या यांना ताब्यात घेऊन तातडीने चौकशी करावी. काही पैसे चेकने तर काही पैसे कॅशने येत आहेत. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. मी हवेत बोलत नाही”, असा दावाही राऊत यांनी केला.

पाहा व्हिडीओ : 2 वर्षात भोंगे, जेम्स लेन आठवावा असं काहीच घडलं नव्हतं

Back to top button