Pulitzer Prize : ३ भारतीय पत्रकारांचा पुलित्झर पुरस्काराने सन्मान; वाचा संपूर्ण यादी… | पुढारी

Pulitzer Prize : ३ भारतीय पत्रकारांचा पुलित्झर पुरस्काराने सन्मान; वाचा संपूर्ण यादी...

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या २०२२ च्या पुलित्झर पुरस्काराची घोषणी सोमवारी करण्यात आली आहे. हा पुरस्कार हा पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार आहे. यावेळी तिघा भारतीय पत्रकारांना हा पुरस्कार दिला आहे. अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू, अमित दवे या पत्रकारांना पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये दिवगंत दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला आहे. राॅयटर्स पत्रकार दानिश सिद्दीकी यांचा मागील वर्षी अफगान विशेष बल आणि तालिबान्यांच्या सुरू असलेल्या संघर्षात रिपोर्टिंग करत असताना मृत्यू झाला होता.

पुलित्झर पुरस्काराचे विजेते पुढीलप्रमाणे…

सार्वजनिक सेवा : ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिलवर झालेल्या हल्ल्याच्या रिपोर्टिंगसाठी ‘वाॅशिंग्टन पोस्ट’ला मिळाला..

ब्रेक्रिंग न्यूज रिपोर्टिंग : फ्लोरिडा समुद्रकिनाऱ्यावरील अपार्टमेंट टाॅवर कोसळत असताना केलेल्या रिपोर्टिंगसाठी मिमायी हेराॅल्डचे कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला.

शोध पत्रकारिता रिपोर्टिंग : रेबेका वुलिंग्टनचे कोरी जी. जाॅन्सन आणि टॉम्पा बे टाईम्सचे आणि एली मरे यांना फ्लोरिडाच्या बॅटरी रिसायकलिंग प्लांटमधील अत्यंत विषारी धोके हायलाइट केल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे.

व्याख्यात्मक रिपोर्टिंग : वेब स्पेस टेलीस्कोपचे काम कसे चालते, याचे रिपोर्टिंग केल्यामुळे क्वांटा पत्रिकाचे कर्मचारी, विशेष करून नताली वोल्चोवर यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

स्थानिक रिपोर्टिंग : बेटर गव्हर्नमेंट असोसिएशनचे मॅडिसन हॉपकिन्स आणि शिकागो ट्रिब्यूनच्या सेसिलिया रेयेस शिकागोच्या अपूर्ण इमारती आणि अग्निसुरक्षेबद्दल अहवाल दिला त्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

राष्ट्रीय रिपोर्टिंग : द न्युयाॅर्क टाईम्सचे कर्मचारी

आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंग : द न्युयाॅर्क टाईम्सचे कर्मचारी

फिचर लेखन : द अटलांटिकचे जेनिफर सीनियर

फिचर फोटोग्राफी : अदनान आबिदी, सना इरशाद मट्टू, अमित दवे आणि राॅयटर्सचे दिवगंत दानिश सिद्दीकी यांना पुरस्कार मिळाला. सिदिक्की यांना कोरोनाकाळात केलेली फोटोग्राफी.

काॅमेंट्री : मेलिंडा हेनेबर्गर

टिकात्मक पत्रकारिता : सलामिशा टिलेट, द न्युयाॅर्क टाईम्स

इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग आणि काॅमेंट्री : फ्युचुरो मीडिया आणि पीआरएक्सचे कर्मचारी

कादंबरी : द नेतन्याहूस, लेखक – जोशुओ कोहेन

नाटक : फॅट हॅम, जेम्स इजामेसो

चरित्र : चेजिंग मी टू माई ग्रेव

कविता : फ्रॅंक, साॅनेट्स, डायनेसीस

सामान्य कथा : अदृश्य बच्चा, एक अमेरिकी शहरामध्ये गरिबी, जीवन सुरक्षा आणि आशा. एड्रिया इलिटल

संगीत : रेवेन चाकोन, वाॅयसलेस मास

पहा व्हिडीओ : 2 वर्षात भोंगे, जेम्स लेन आठवावा असं काहीच घडलं नव्हतं 

Back to top button