राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आले, पण उद्घाटन न करताच गेले! | पुढारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आले, पण उद्घाटन न करताच गेले!

नांदेड; पुढारी ऑनलाईन : गेल्या आठवड्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यातील वादाने आता नवे वळण घेतले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नांदेडमधील मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन कार्यक्रम रद्द केला.

या कार्यक्रमावरच राज्य सरकारने आक्षेप घेतला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून नांदेड, परभणी आणि हिंगोली दौऱ्यावर आहेत.

नांदेडमध्ये ते स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करणार होते.

तसेच गुरद्वारा भेट आणि शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक घेणार होते.

रामानंद तीर्थ विद्यापीठात अल्पसंख्याक विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यावरून वाद निर्माण झाला होता.

हे होस्टेल राज्य सराकरने बांधले असून ते अजूनही विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आले नसल्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी केला होता.

तसेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकी आयोजित केल्या होत्या. त्यावरही आक्षेप घेतला होता.

राज्यपाल राज्य सरकारच्या अधिकारांत हस्तक्षेप करत आहेत असा आरापे केला होता. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या कार्यक्रमात बदल केला होता.

आज राज्यपाल कोश्यारी नांदेडमध्ये गेले होते. त्यांनी विद्यापीठातील वसतीगृहाची पाहणी केली. मात्र, त्यांनी उद्घाटन न करता ते तिथून निघून गेले.

विद्यापीठाने या उद्घाटन सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली होती. मात्र राज्यपालांनी उद्घाटन सोहळाच रद्द केला.

त्यामुळे विद्यापीठाची नाचक्की झाल्याचे बोलले जाते. हा उद्घाटन सोहळा रद्द करून राज्यपाल थेट गुरुद्वारात दर्शनासाठी निघून गेले.

गुरुद्वाराला भेट देऊन बैठकीला

होस्टेलचा उद्घाटन सोहळा रद्द केल्यानंतर राज्यपाल कोश्यारी गुरुद्वाराला गेले. तेथून ते शासकीय विश्रामगृहात गेले.

तेथे ते जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. उद्या ते परभणी दौऱ्यावर आहेत.

पहा व्हिडिओ:  SMA  टाईप 1 ने पीडित  वेदिका अखेर गेली

Back to top button