तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार : संजय राऊत यांची घणाघाती टीका | पुढारी

तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार : संजय राऊत यांची घणाघाती टीका

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “मोदी हिटलरसारखे इव्हेंट्स फार करतात. मोदी पूर्णपणे हिटलरला फाॅलो करतात. त्यामुळे मोदींच्या प्रचारात आणि हिटलरच्या प्रचारात बरंच साम्य आहे. हिटलरच्या काळातही आजच्यासारखी विरोधकांना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली होती. तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे”, अशी घणाघाती टीका आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली.

शिवेसेनेने आयोजित केलेल्या सोशल मीडिया मेळाव्यात बाेलताना संजय राऊत म्हणाले, “शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है. बाळासाहेब यांनी गरम रक्ताची पिढी राजकारणात आणली. बाळासाहेब तरुणांचे नेते होते. शिवसेना हा तरुणांचा पक्ष आहे. ताकद सेनेची आहे आणि सेनेचीच राहील. देशातील सर्वांत मोठा ब्रॅंड शिवसेना आहे. जे खरं असते ते लोकप्रिय होतंच असं नाही, तर जे लोकप्रिय असतं ते खरं असतंच असं नाही. सध्याचं राजकीय वातावरण असंच काहीसं आहे”.

 “हे राज्य आपण भारतीय जनता पक्षाच्या हातून आपण खेचून घेतले आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांमध्ये भाजपाकडून विषारी प्रचार करण्यात आलh. मी जर रोज सकाळी बोललो नाही तर भाजपाचा कार्यक्रम सेट होणार नाही. अंगावर येणाऱ्यांना डम्‍पिंग फेकून दिलं जाईल. राहुल गांधी यांची प्रतिमा मलीन करण्यामागे भाजपाचा हात आहे. सुशांत सिंह राजपूत, कंगणा राणावर यांच्या प्रकरणात आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या जेलमध्ये जाणारच. आपल्या चेहऱ्यावर तणाव दिसणं हा आपला पहिला पराभव असतो. त्यामुळे शिवसेनेची लढण तितकं सोपं नाही. आम्हाला जे करायचं होते ते आम्ही केले. “, असा दावाही त्‍यांनी यावेळी केला.

Back to top button