कांद्याचे दर ढासळल्याने उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी - पुढारी

कांद्याचे दर ढासळल्याने उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा : प्रतिक्विटंल अडीच ते तीन हजार रुपये दर मिळणार्‍या कांद्याला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शंभर ते पंधराशे रुपयांपेक्षाही कमी दर मिळाला. कांद्यातून नफा सोडा पण वाहतूक खर्चही न निघाल्याने उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 200 ते 250 ट्रक कांदा येत आहे. सध्या कांद्याचा हंगाम संपला असला, तरीही कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे.
स्थानिक शेतकर्‍यांजवळील कांदा संपला असला, तरी पुणे, नगर, बीड येथून कांदा बाजारात येत आहे. या कांद्याचा प्रतिक्विटंल सरासरी दर 700 ते 800 रुपये इतका आहे. यामुळे उत्पादकांत चिंता पसरली असून पान 2 वर

महागाईच्या झळांत कांद्याचे दर कोसळल्याने उत्पादकांतून संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक शेतकर्‍यांजवळील कांदा सुरू होता त्यावेळी कांद्याचा दर दोन ते अडीच हजार रूपयापर्यंत होता. मात्र आता कांद्याचा दर पंधराशे रूपयाच्या आत आले आहेत. शेतकर्‍यांना लागवड खर्च आणि विक्री खर्च वजा केल्यास हाती काहीच लागत नसल्याचे दिसत आहे.

दोन वर्षापूर्वी कांदा कवडीमोल दराने विक्री झाल्याने प्रति क्विटंल 200 रूपयाचे अनुदान शासनाने उत्पादकांना दिले होते. त्याप्रमाणे शेतकर्‍यांना अनुदान देण्याची मागणी केली जात आहे. एकीकडे कांदा जरा महागला की, ओरड होते परंतु शेतकर्‍यांना कवडीमोल दराने कांदा विक्री करावे लागत असताना अशा वेळी का ओरड होत नाही असा प्रश्न उत्पादकांमधून निघत आहे.
सध्या सोलापूर बाजार समितीसह राज्यातील सर्व बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे.

महागाईच्या झळांत कांद्याचे दर कोसळल्याने उत्पादकांतून संताप व्यक्त होत आहे. स्थानिक शेतकर्‍यांजवळील कांदा सुरू होता त्यावेळी कांद्याचा दर दोन ते अडीच हजार रूपयापर्यंत होता. मात्र आता कांद्याचा दर पंधराशे रूपयाच्या आत आले आहेत. शेतकर्‍यांना लागवड खर्च आणि विक्री खर्च वजा केल्यास हाती काहीच लागत नसल्याचे दिसत आहे. दोन वर्षापूर्वी कांदा कवडीमोल दराने विक्री झाल्याने प्रति क्विटंल 200 रूपयाचे अनुदान शासनाने उत्पादकांना दिले होते. त्याप्रमाणे शेतकर्‍यांना अनुदान देण्याची मागणी केली जात आहे. एकीकडे कांदा जरा महागला की, ओरड होते परंतु शेतकर्‍यांना कवडीमोल दराने कांदा विक्री करावे लागत असताना अशा वेळी का ओरड होत नाही असा प्रश्न उत्पादकांमधून निघत आहे. सध्या सोलापूर बाजार समितीसह राज्यातील सर्व बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे.

कांदा उत्पादकांकडे सरकारचे दुर्लक्ष

एकीकडे कांद्याचे दर पडलेले असताना शेतकर्‍यांना किमान आधारभूत किंमत तरी मिळाली पाहिजे. यासाठी राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, शासनाकडून याबाबत किमान आधारभूत किमतीसाठी कोणताच निर्णय घेतला जात नाही. शासकीय यंत्रणेबरोबर सरकारलाही शेतकर्‍यांचा विसर पडला आहे का, असा प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित होत आहे. कांद्याची लागवड यंदा अधिक प्रमाणात शेतकर्‍यांनी केल्यामुळे दर कमी झाले आहेत. शिवाय बाजारात येणारा कांदा हा एक पत्तीचा आहे. तो कांदा 200 ते 250 किलोमीटर जाईपर्यंत खराब होतो. त्यामुळे कांद्याचे दर कमी झाले आहेत.
– संजय रगबले,
आडत दुकानदार

Back to top button