कॉमेडीयन श्याम रंगीला आता राजकारणाच्या मैदानात 'रंगणार'! 'आप'मध्ये केला प्रवेश | पुढारी

कॉमेडीयन श्याम रंगीला आता राजकारणाच्या मैदानात 'रंगणार'! 'आप'मध्ये केला प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करणारा विनोदी कलाकार श्याम रंगीला याने आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. गुरूवारी पक्ष प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. पक्षाचे प्रभारी विनय मिश्रा यांनी श्याम रंगीलाला पक्षाचे सदस्य पद दिले. यावेळी त्याने केजरीवालांचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.

रंगीला म्हणाला की, “अरविंद केजरीवाल यांचासारखा नेता मी कोणत्याच पक्षात पाहिला नाही. जो नेता असा म्हणतो की, माझं काम तुम्हाला पसंत नाही आलं, तर पुढील वेळी मला मते देऊ नका. त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी प्रभावित होतो, त्यामुळे मी आम आदमी पक्षात प्रवेश करत आहे.”

“पक्षाने सध्यातरी माझ्यावर कोणतीच जबाबदारी दिलेली नाही. कारण, स्वतंत्रपणे काम करण्यास सांगितले होते.” आपकडून अधिकृतरित्या श्याम रंगीला पक्षात प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली आहे. आपने ट्विट करत म्हटलंय की, “राजस्थानचे प्रसिद्ध विनोदी कलाकार श्याम रंगीला आम आदमी पार्टीत प्रवेश करत आहेत. ते आपल्या कलाकारीने लोकांना पक्षाने केलेली कामे सांगत लोकांना जागृतगी करतील.”

श्याम रंगीला म्हणाला की, “आप दुसऱ्या पक्षाप्रमाणे आरोप-प्रत्यारोपचे राजकारण करत नाही. पंजाबमध्ये आपची सत्ता येण्यापूर्वीच मी आपचे समर्थन करत होतो. याचं कारण, पक्षाने दिल्लीमध्ये केलेले काम होते. राजस्थानचे लोकदेखील परिवर्तनाकडे पाहत आहेत. यावेळी ते आपला संधी देऊ इच्छित आहेत. जर आपने राजस्थानात योग्य काम केले नाही, तर मी स्वतः ५ वर्षांनंतर आपला विरोध करेन आणि लोकांच्या बाजुने उभा राहीन.”

असे असले तरी श्याम रंगीला यापूर्वी २०१४ मध्ये भाजपाचे समर्थन करताना दिसत होता. त्यावर श्याम रंगीला म्हणाला की, “मी त्यावेळी भाजपाच्या विकासाच्या आणि परिवर्तनाच्या भाजपाच्या घोषणांनी प्रभावित झालो होतो. मी त्यावेळी स्वतंत्र्यपणे भाजपाच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्याचं कामदेखील केलेले होते. यामध्ये पार्टीकडून मला नियुक्त करण्यात आले नव्हते.”

पहा व्हिडीओ : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा थोडक्यात

Back to top button