Umran Malik : आयपीएलच्या इतिहासात ठरला दुसरा वेगवान गोलंदाज, उमराननं रचला इतिहास | पुढारी

Umran Malik : आयपीएलच्या इतिहासात ठरला दुसरा वेगवान गोलंदाज, उमराननं रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स झालेल्या सामन्यात उमरान मलिक महागडा गोलंदाज ठरला. उमरान गोलंदाजी करत असताना हैदराबादचा कर्णधार के. एम. विल्यमसनने झेल सोडला. त्यामुळे या सामन्यात उमरानला एकही विकेट पटकावता आली नाही. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पॉवेलने उमरान मलिकची चांगलीच धुलाई केली.

उमरान मलिकने ४ षटकांमध्ये ५२ धावा दिल्या. सोबत सहा वाईडही टाकले. जेव्हा खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असते. तेव्हा वेगवान गोलंदाजी कामी येत नाही हे उमरानला समजले असेल. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असते, तेव्हा गोलंदाजीमध्ये विविधततेचीही गरज असते. पण तरीही उमरानने या सामन्यात इतिहास रचला आहे. (Umran Malik)

जी कामगिरी शोयब अख्तर आणि ब्रेट ली करू शकले नाहीत ती कामगिरी उमरान मलिकने करून दाखवली आहे. उमरान मलिकने हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात आयपीएलच्या या हंगामातील सर्वांत वेगवान गोलंदाजी केली. तर आयपीएलच्या इतिहासातील वेगवान गोलंदाजी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे. उमरानने हा वेगवान चेंडू शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर टाकला. (Umran Malik)

संबंधित बातम्या

हेही वाचलतं का?

Back to top button