सातारा : किसनवीर कारखान्याची सत्तांतराकडे वाटचाल | पुढारी

सातारा : किसनवीर कारखान्याची सत्तांतराकडे वाटचाल

सातारा, पुढारी वृत्तसेवा : किसनवीर सहकारी साखर कारखान्याची हवा बदलत चालली असून, सत्तांतराकडे वाटचाल सुरू झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच आ. मकरंद पाटील- नितीन पाटील गटाने विजयाकडे कुच केली असून, कारखाना बचाव पॅनलच्या सर्व शिलेदारांनी विजयी पथावर मार्गक्रमण सुरू केले होते. ऊस उत्पादक गटांसह सर्वच मतदारसंघांमध्ये कपबशीच्या चिन्हाने आघाडी घेतली असून कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांचे शेतकरी विकास पॅनल पिछाडीवर गेले आहे. पहिल्या फेरीपासूनच आबा-काका गटाचे उमेदवार दोन ते चार हजार मतांनी लीडवर आहेत.

किसनवीर कारखाना निवडणुकीत २१ जागांसाठी ४६ जण  रिंगणात उतरले होते. त्यांच्यासाठी तब्बल 69.31 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज सकाळी 8 वाजल्यापासून श्रीनिवास मंगल कार्यालय, एमआयडीसी वाई येथे मतमोजणी सुरु झाली. 154 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यापैकी निम्म्या म्हणजे 77 मतदान केंद्रांची पहिल्या फेरीत मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला संस्था व  ऊसउत्पादक गट यांच्या मतपत्रिका वेगवेगळ्या करून मतमोजणीस प्रारंभ  झाला. प्रत्यक्ष मतमोजणीस  सुरुवात  झाल्यानंतर एकूण कल पाहता आ. मकरंद पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलला मतदारांनी पहिली पसंती  दिल्याचे दिसून आले. मतमोजणी पुढे गेली तसतशी  दोन्ही पॅनेलमधील मतांचा फरक हा वाढत गेला. मदन भोसले  यांचे पॅनेल पिछाडीवर पडले आहे. यामुळे निकालाचा कल हा पाटील बंधू व त्यांच्या पॅनेलच्या बाजूने झुकला  असल्याचे स्पष्ट झाले.

आ. मकरंद पाटील यांची पहिल्या फेरीपासूनच विजयाकडे कूच

सुरुवातीला सोसायटी मतदारसंघाची मोजणी सुरू झाली. सोसायटी गटातून शेतकरी बचाव पॅनलचे आ. मकरंद पाटील यांना पहिल्या राऊंडमध्ये 113 तर विरोधी शेतकरी विकास पॅनलचे रतनसिंह शिंदे यांना 58 मते पडली. आ. मकरंद पाटील यांनी पहिल्या राऊंडमध्ये ५३ मतांची आघाडी घेतली.

नितीन पाटील यांची जोरदार घोडदौड

ऊस उत्पादक गटामध्ये लक्षवेधक ठरलेल्या कवठे गटात पहिल्या फेरीमध्ये जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांची जाेरदार घाेडदाैड सुरु आहे. त्यांच्यासह बचाव पॅनलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती.  नितीन पाटील यांना पहिल्या फेरीत 10878, रामदास गाढवे 10810, किरण काळोखे 10571 तर शेतकरी विकास पॅनलचे  दत्तात्रय गाढवे 6863,  प्रवीण जगताप 6807, प्रताप यादव 6801 मते मिळाली.

भुईंज गटातून मदन भाेसले पिछाडीवर

ऊस उत्पादक भुईंज गटात पहिल्या फेरीत मदन भोसले पिछाडीवर गेले आहेत. याठिकाणी शेतकरी बचाव पॅनलचे प्रकाश धुरगुडे 10583, रामदास इथापे 10497, प्रमोद शिंदे 10458 तर शेतकरी विकास पॅनलचे मदन भोसले 7081, जयवंत पवार 6895, दिलीप शिंदे 6669 अशी मते मिळाली.

ऊस उत्पादक कोरेगाव गटातील पहिल्या फेरीअखेरीचे मतदान असे – मेघराज भोईटे 6150, दिलीप जाधव 62, नवनाथ केंजळेे 6754, ललित मुळीक 10584, शिवाजी पवार 6752, संजय फाळके 10679, सचिन साळुंखे 10619.

ऊस उत्पादक सातारा गटातील पहिल्या फेरीअखेरचे मतदान असे – संदीप चव्हाण 10869, बाळासाहेब कदम 10735, सचिन जाधव 10816, भुजंगराव जाधव 6683, चंद्रकांत इंगवले 6847, अनिल वाघामळे 6590.

ऊस उत्पादक बावधन गटातील पहिल्या फेरीचे मतदान – शशिकांत पिसाळ 10757,  दिलीप पिसाळ 10907, हिंदुराव तरडे 10512, चंद्रसेन शिंदे 6708, सचिन भोसले 7001, विश्वास पाडळे 6808.

अनुसुचित जातीमध्ये कांबळेंची सरशी

अनुसूचित जाती जमाती गटामध्ये मकरंद पाटील गटाचे संजय कांबळे यांनी पहिल्या फेरीत सरशी घेतली. त्यांना 11 हजार 112 तर मदन भोसले गटाचे सुभाष खुडे यांना 7 हजार 48 मते पडली.

हणमंत चवरे आघाडीवर

भटक्या विमुक्त जाती गटामध्ये मकरंद पाटील गटाचे हनुमंत चवरे यांना पहिल्या फेरीमध्ये 10 हजार 982 तर मदन भोसले गटाचे चंद्रकांत काळे यांना 7 हजार 194 मते पडली.

जमदाडेंचीही बाजी

इतर मागास प्रवर्गातून पहिल्या फेरीमध्ये मकरंद पाटील गटाचे शिवाजी जमदाडे यांना 11031 तर मदन भोसले गटाचे आनंदा जमदाडे यांना 7117 मते पडली.

महिला राखीवमध्ये जाधव, वीर आघाडीवर

महिला राखीव गटात पहिल्या फेरीमध्ये  सुशीला जाधव यांना 10 हजार 915 व सरला वीर यांना 10 हजार 710 मते पडली. मदन भोसले गटाच्या विजय सावंत यांना 6 हजार 870 तर आशा फाळके यांना 6 हजार 971 मते मिळाली होती.

पाहा व्हिडिओ : भोंग्यांच्या बाबतीत कायदा काय सांगतो ? | विधितज्ज्ञ असीम सरोदे यांच्याशी बातचीत

Back to top button