ऑलिम्‍पिकमध्ये हॉकी संघाने रचला इतिहास; कोल्‍हापुरात जल्‍लोष

कोल्‍हापूर; पुढारी वृत्‍तसेवा : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा ५-४ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. भारतीय हॉकी संघाच्या या विजयानंतर कोल्हापुरात जल्लोष करण्यात आला.

१९८० नंतर पहिल्यांदाच म्हणजेच तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने पदक मिळवले. त्‍या पार्श्वभूमीवर कोल्‍हापुरातील हॉकी संघटना आणि खेळाडूंनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे जल्लोष केला.

यावेळी खेळाडूंनी हलगीच्या ठेक्‍यावर नृत्‍य करत गुलालाची उधळण आणि फटाक्‍यांची आतीषबाजी करत आनंद व्यक्‍त केला.

 

Back to top button