आंबा घाट हलक्या वाहनांसाठी खुला; कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरू - पुढारी

आंबा घाट हलक्या वाहनांसाठी खुला; कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट येथील वाहतूक आज (गुरुवार) सकाळपासून हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आली. सहा चाकी तसेच अवजड वाहनांना अद्यापही आंबा घाट मार्गावर वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

हलक्या वाहनांमध्ये दुचाकी चारचाकी आणि महिंद्रा पिकअप या वाहनांचा समावेश आहे. पंधरवड्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा घाटातील दरड कोसळली होती.

यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट येथील रस्ता धोकादायक बनला होता. त्यामुळे या मार्गावरील सर्वच वाहतूक बंद करण्यात आली होती.

दरम्‍यान, महामार्गाची दुरुस्ती गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रंदिवस सुरू होती.

बुधवारी सायंकाळी मार्गाची चाचणी घेतल्यानंतर आज सकाळपासून हलक्या वाहनांसाठी हा महामार्ग खुला करण्यात आल्याचे शाहूवाडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी सांगितले.

Back to top button