"धुडगूस घालायला अक्कल लागत नाही" अजित पवारांचा राज ठाकरेंवर बोचरा वार | पुढारी

"धुडगूस घालायला अक्कल लागत नाही" अजित पवारांचा राज ठाकरेंवर बोचरा वार

पुढारी ऑनलाईन डेस्क : “सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम पवारांनी केलं आहे. यांचं वय जेवढं आहे, तेवढं शरद पवारांचं काम आहे. धुडगूस घालायला अक्कल लागत नाही. पठ्ठ्यानं साधी एखादी सोसायटी तरी काढली आहे का ? उचलली जीभ लावली टाळ्याला… ही सगळी नौटंकी आहे. दिवस मावळला की, यांची सभा सुरू होते. नकलाकार आहेत की, भाषण करायला आले आहेत ? पेट्रोल-डिझेल दरवाढीबद्दल, विकासावर कधी बोलले का ?”, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित करून राज ठाकरे यांच्यावर थेट टीका केली.

येवला येथे आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, “जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. राज्यातील चांगलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरेंना शिवाजी महाराज कधी समजेलंच नाहीत. आमच्या नसानसात शिवाजी महाराज आहेत. समाजाला प्रेरित करण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. संध्याकाळी थंड हवा सुटल्यानंतर यांची सभा सुरू होते. लोकांना भडकवून प्रश्नं सुटत नाहीत”, असेही मत अजित पवार यांनी मांडलं.

Back to top button