कोल्हापूर : राधानगरी धरण : ४ दरवाजे पुन्हा उघडले | पुढारी

कोल्हापूर : राधानगरी धरण : ४ दरवाजे पुन्हा उघडले

कोल्हापूर/राधानगरी : पुढारी वृत्तसेवा  राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली असून, राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगलाच जोर धरला आहे.

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून, प्रतिसेकंद 5 हजार 712 क्युसेक्स, तर विद्युतनिर्मितीसाठी 1 हजार 400 असा एकूण 7 हजार 112 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे.

पंचगंगा नदीची मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास 23 फुटांवर असणारी पाणी पातळी बुधवारी रात्री 27 फुटांवर आली. अद्यापही 9 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली. धरण क्षेत्रांतहीपावसाचा जोर वाढल्याने धरणाचे दिवसभरात चार दरवाजे उघडले. सकाळी 10.28 वाजता सहाव्या क्रमांकाचा दरवाजा, 10.34 वाजता तिसर्‍या क्रमांकाचा दरवाजा उघडला. यातून 4 हजार 256 क्युसेक्स विसर्ग सुरू झाला. दुपारी 3.55 वाजता पाचव्या क्रमांकाचा, तर 4 वाजता चौथ्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. धरणातून आता सेकंदाला 7 हजार 112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गगनबावडा येथे 70.9 मि.मी. पाऊस

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 70.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी दुपारी 12 च्या पर्जन्य अहवालानुसार 24 तासांत पडलेल्या एकूण पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये अशी, हातकणंगले-7.7, शिरोळ-5.8, पन्हाळा-18.5, शाहूवाडी-24.1, राधानगरी-32.7, गगनबावडा- 70.9, करवीर-23.4, कागल- 17.2, गडहिंग्लज-9.3, भुदरगड-28.9, आजरा-18.6 व चंदगड-24.1 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

अद्यापही 19 बंधारे पाण्याखालीच

पंचगंगा नदीवरील-शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी-हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे. वारणा नदी-चिंचोली, माणगाव व खोची. कासारी नदी-यवलूज, पुनाळ-तिरपण व ठाणे-आळवे. दूधगंगा नदी-दत्तवाड, बाचणी व सिद्धनेर्ली असे एकूण 19 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये तुळशी -87.65 द.ल.घ.मी., वारणा -860.97, दूधगंगा-603.03, कासारी-60.35, कडवी-71.24, कुंभी-72.48, पाटगाव 97.48, चिकोत्रा-39.97, चित्री-53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -44.17, जांबरे- 23.23, आंबेओहोळ-30.98 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा आहे.

बंधार्‍यांची पाणी पातळी अशी, राजाराम-25.6 फूट, सुर्वे-24.8, रूई-55, इचलकरंजी-51.6, तेरवाड-49.08, शिरोळ-43, तर नृसिंहवाडी बंधार्‍याची 46 फूट इतकी पाणी पातळी आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास इतर दरवाजे खुले होण्याची शक्यता असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना शाखा अभियंता समीर निरुखे यांनी दिल्या आहेत.

Back to top button