सातारा : कुख्यात गुन्हेगार ‘नाना’ला अटक | पुढारी

सातारा : कुख्यात गुन्हेगार ‘नाना’ला अटक

सातारा; पुढारी वृत्तसेवा : एका खुनाच्या गुन्ह्यासह इतर सोळा गुन्ह्यात पसार असलेल्या पोलिस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार यश ऊर्फ नाना पाटेकर भाऊबीज ऊर्फ भावज्या काळे (मूळ रा. फत्त्यापूर सध्या रा. आसगाव, ता. सातारा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.

दरम्यान, संशयितावर 1 खून, विनयभंग व इतर चोरीचे असे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, नाना पाटेकर याच्याविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून, सातारा तालुका हद्दीत विनयभंग, भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 13 गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यात तो सातारा पोलिसांना वॉन्टेड होता. स्थानिक पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता.

कोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी झाल्यानंतर पोलिस त्या घरफोडीचा शोध घेत असताना त्यामध्ये संशयित नाना पाटेकर असल्याचे समोर आले. एलसीबीचे पोलिस तपास करत असताना त्यांना त्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताकडे चौकशी केली असता त्याने कोरेगावमधील घरफोडीची कबुली दिली.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्यावर 16 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तसेच मर्डरसारख्या गुन्ह्यात देखील तो पसार असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्याला कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, पोलिस हवालदार कांतीलाल नवघणे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, अतिश घाडगे, शरद बेबले, मंगेश महाडीक, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, रोहित निकम, सचिन ससाणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button