BJP : “बाबरी पाडताना भाजपाचे ३२ आरोपी होते, त्यात मीदेखील उपस्थित होतो”; देवेंद्र फडणवीसांचा दावा | पुढारी

BJP : "बाबरी पाडताना भाजपाचे ३२ आरोपी होते, त्यात मीदेखील उपस्थित होतो"; देवेंद्र फडणवीसांचा दावा

मुंबई, पुढारी ऑनलाईन : “महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लावायचं काम तुमच्या सरकारने केलेले आहे. तुमच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे. मशिदीवरील भोंगे काढायला हे घाबरतात. काहींना आम्ही म्हणजे महाराष्ट्र. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मराठी नाही. बाबरी मशीद पाडल्याच्या आरोपींमध्ये तुमचा एकही आरोपी दिसत नाही. बाबरी पाडताना मी उपस्थित होतो”, असा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.मुंबईत भाजपच्या पोलखोल अभियानाचा समारोप आज (दि.१) करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कऱण्यात आलेल्या बूस्टर डोस सभेत फडणवीस यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला.

सोमय्या मैदानावर आयोजित केलेल्या बुस्टर डोस सभेत फडणवीस म्हणाले की, “बाबरी प्रकरणात भाजपाचे ३२ आरोपी होते. यामध्ये एकही तुमचा नेता नव्हता. बाबरी आम्ही पाडली. पण, श्रेय कधी घेतले नाही. राणा दाम्पत्य हनुमानचालिका म्हणायला आल्यानंतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तुम्ही रामाच्या बाजुने की रावणाच्या ते एकदा स्पष्ट करा”, अशी टीका फडणवीस यांनी केली. तुमचं हिंदूत्व गदाधारी नाही, तर गधाधारी आहे. तुमचे नेते जेव्हा तुरंगात जातात, तेव्हा महाराष्ट्र देशात बदनाम होतो. बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती ? बाबरीप्रकरणी ३२ आरोपी भाजपमधील होते. आमच्या नेत्यांनी शिक्षा भोगली. त्या ३२ आरोपीमध्ये तुमचा एकही नेता नव्हता, असे सांगून भोंगे उतरविण्याची हिंमत नाही, आणि बाबरी मशीद पाडली म्हणतात, अशी कडाडून टीका फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेवर केली.

तुमच्या भ्रष्टाचार, दुराचारामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. विरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले. १४ तारखेनंतर पोलखोल सभा घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगून नुसत्या इफ्तार पार्टीनेही रोजगाराच्या समस्या सुटणार नाहीत. भाजप सत्तेत होती. त्यावेळी गुंतवणूक चार पटीने येत होती. हनुमान चालिसा म्हणायला आल्यावर राजद्रोहाचा गुन्हा राणा दाम्पत्यावर दाखल केला जात आहे. आम्ही म्हणजेच महाराष्ट्र, आम्ही म्हणजेच मराठी, असा काही लोकांचा गैरसमज झाला आहे. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, असा टोला फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नांव न घेता लगावला. महाराष्ट्र म्हणजे १८ पगड जातीच्या १२ कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केला आहे. तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान, असे ते म्हणाले.

त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान. परंतु मी त्यांना नम्रपणे सांगतो की, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. आणि आज हेही त्यांना सांगण्याची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे हिंदू नाही. पण मी हे म्हणणार नाही. कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्र पिछाडीवर नेण्याचं काम महाविकास आघाडीने केलेलं आहे. मराठी शाळा बंद पडत आहे, तर दुसरीकडे उर्दू शाळा सुरू होत आहेत. मुंबईत मराठी माणसाला घर मिळत नाही. जनता भाजपाकडून विकासाची आशा करत आहे, असे मत भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मांडले. तर आशीष शेलार म्हणाले की, “शिवसेनेनेकडे फक्त अधर्मच राहिलेला आहे. जो हनुमानचालिसाला विरोध करेल, जो राम मंदिराच्या जागेला विरोध करेल, त्यांच्याबरोबर धर्म कसा असेल? आम्ही मुंबईकरांच्या पैशांचा हिशोब मागतोय.”

हेही वाचलंत का ? 

Back to top button