मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना | पुढारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) पुण्याहून औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. तत्पुर्वी त्यांच्या राजमहल निवासस्थानी १०० पुरोहितांनी मंत्रोच्चार करुन राज ठाकरेंना आशिर्वाद दिला. ते  पुण्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वढू गावाजवळ थांबून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली वाहून औरंगाबादकडे रवाना होणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल  मुंबईवरुन  पुणे (Raj Thackeray) दौऱ्यासाठी रवाना झाले होते. त्यांची  ठिकठिकाणी स्वागताची जंगी तयारी केली आहे. ते आज आपला पुणे दौरा पुर्ण झाल्यानंतर औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मुंबई ते औरंगाबाद त्यांची जय्यत तयारी केली आहे.

सांस्कृतिक मंडळावर १ मे रोजी होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला अखेर गुरुवारी (दि. २८) पोलिसांनी परवानगी दिली. सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण होईल, कोणत्याही समुदायाचा अनादर होणार नाही आणि १५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना निमंत्रण देऊ नका यासारख्या १६ अटी घालून ही परवानगी दिल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले. काल (दि. २९) ते पुणे दौऱ्यासाठी रवाना झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी नवी मुंबईपर्यंत  ठिकठिकाणी  जंगी तयारी केली आहे.  पुणे दौरा पुर्ण झाल्यानंतर ते  आज औरंगाबाद दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

हेही वाचलंत का? 

.

Back to top button