Russia-Ukraine War : युक्रेनच्या ‘या’ गावकऱ्यांची कट्टर देशभक्ती; गावात पूर आणून थोपवलं रशियन सैन्य | पुढारी

Russia-Ukraine War : युक्रेनच्या 'या' गावकऱ्यांची कट्टर देशभक्ती; गावात पूर आणून थोपवलं रशियन सैन्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : दोन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. बलाढ्य असणाऱ्या रशियाला युक्रेन कडवा विरोध करताना दिसत आहे. या युद्धात सामान्य नागरिकांना कोणताही धोका नसल्याचं रशियाने सांगितले असले तरी युक्रेनचे नागरिकदेखील रशियन सैन्याला कट्टल विरोध करताना दिसत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. रशियन सैनिकांना रोखण्यासाठी युक्रेनच्या उत्तरेला किव्हजवळ असणाऱ्या डेमीडिव्ह गावातील युक्रेनियन नागरिकांनी पूरस्थिती निर्माण केली आहे. (Russia-Ukraine War)

Image

रशियन सैनिकांना रोखण्याासाठी डेमीडिव्हच्या गावकऱ्यांनी जाणीवपूर्वक गावात पूर आणला असला तरी त्यामध्ये गावाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पुरस्थितीमुळे सभोतालच्या शेतात दलदल तयार झाली, परिणामी रशियन टॅंकमधून जे किव्हवर जे हल्ले होत होते ते थांबले. त्यामुळे युक्रेनच्या सैनिकांना हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ मिळाला. युक्रेनियन नागरिकांनी देशाप्रती दाखलेल्या या प्रेमामुळे त्यांची चर्चा जगभरात होत आहे. (Russia-Ukraine War)

Image

डेमीडिव्ह गावातील नागरिक अँँटोनिना कोस्तुचेन्को यांनी सांगितले की, “युद्धनितीचा भाग म्हणून आम्ही जाणीवपूर्वक पूरस्थिती निर्माण केली. यामध्ये गावाचं प्रचंड नुकसान झालं असलं तरी आम्हाला त्याचा पश्चाताप नाही. पण, आम्ही किव्ह वाचवलं, याचा अभिमान आहे. जेव्हा रशियन सैन्य जवळ आलं तेव्हा गावातील धरणाचे दरवाजे उघडले आणि गावात पूरस्थिती निर्माण केली. त्यामुळे रशियन सैन्य अडचणीत आलं. “

Image

युक्रेनचे पायाभूत सुविधांचे मंत्री ओलेक्झांडर कुब्राकोव्ह म्हणाले की, “आतापर्यंत युक्रेनमध्ये ३०० पेक्षा अधिक पूल उद्ध्वस्त झाले आहेत.” रशियाने युद्धाच्या पहिल्या दिवशीत किव्हमधील विमानतळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा युक्रेनियन सैनिकांनी विमानाच्या धावपट्टीवरच गोळीबार करत खड्डे पाडले. त्यामुळे रशियन दलाचे विमानेच लोड मिळूच शकले नाही.

हे वाचलंत का? 

Back to top button