chaskaman dam : चासकमान धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना खबरदारीचा इशारा | पुढारी

chaskaman dam : चासकमान धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना खबरदारीचा इशारा

कडूस; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भिमाशंकर अभयारण्यासह कळमोडी, चासकमान धरण (chaskaman dam) क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे. परंतु पावसाने एकूण ८.५३ तर उपयुक्त ७.५७ टिएमसी क्षमता असलेले चासकमान धरण (chaskaman dam) बुधवारी (ता. ४) मध्यरात्री २ वाजता १०० टक्के भरले. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून चासकमान धरणाचे पाचही दरवाजे प्रत्येकी ५ सेंटीमीटरने उघडले आहेत.

दरम्यान, सकाळी ८ वाजता धरणाच्या सांडव्याद्वारे ९२५ क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

चासकमान धरण परिसरात एकूण ४४० मिलिमीटर तर मागील २४ तासांत १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या धरणामध्ये २००० क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होत आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पावसाचा अंदाज घेऊन धरणातून पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातून कमी अधिक विसर्ग होत असल्याने चास-कडूस नदीवर असणारा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने ५०० क्युसेक्सने सोडण्यात आलेला विसर्ग ८५० क्सुसेक्स वेगाने सोडण्यात आला.

धरणाच्या खालील बाजूस असलेला विजनिर्मीती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. यातून २ मेगावॅट विजनिर्मिती सुरू झाली आहे.

दरम्यान चासकमन धरण क्षेत्रात असलेल्या पूर परिस्थिती निर्माण झाल्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

चासकमान धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पाण्याच्या परिस्थितीवर कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत.

कळमोडी धरणाच्या पाणलोट एकूण क्षेत्रांत ९३२ मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली.

कळमोडी धरण पुन्हा ओहोरफ्लो झाल्याने आठही स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. कळमोडी धरणातील पाणी चासकमान धरणाला मिळत आहे.

सध्या धरणामध्ये १०० टक्के इतका पाणी साठा झाला असून धरणाची पाणी पातळी ६४९.५३ मीटर झाली आहे. एकुण साठा २४१.६९ दलघमी तर उपयुक्तसाठा २१४.५० दलघमी झाला आहे.

Back to top button