कर्नाटक मंत्रिमंडळ आज विस्तार : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती | पुढारी

कर्नाटक मंत्रिमंडळ आज विस्तार : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : बहुप्रतिक्षित कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि.4) निश्‍चित झाला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती राजभवनाला दिली आहे. याकरिता सकाळी 11 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता अशा दोन वेळा मागितल्या आहेत.

मंत्रिपद मिळणार्‍यांना थेट संपर्क साधून बंगळूरचे निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान. दै. ‘पुढारी’ने मंगळवारच्या अंकात ‘मंत्रिमंडळ निश्‍चित, शपथविधी उद्या’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते ते खरे ठरले.

बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी कसरत सुरू केली होती. याकरिता ते दोनवेळा दिल्ली दौर्‍यावर गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन मंत्रिपदाची नावे निश्‍चित केली. गतवेळेप्रमाणेच यावेळी उपमुख्यमंत्रिपद कायम ठेवण्याबाबत दीर्घ चर्चा करण्यात आली.

याकरिता ते दोनवेळा दिल्ली दौर्‍यावर गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा त्यांची भेट घेऊन मंत्रिपदाची नावे निश्चित केली.

आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून या पदांची गरज असल्याचा दावा बोम्मई यांनी केला. यासाठी ते दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून होते. मंगळवारी रात्री ते बंगळूरला यादीसह परतले. त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष नवीन कुमार कटीलही होते.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने राजभवनाला मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी करण्याबाबत कळवले आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविणार आहेत. मंत्रीपद मिळणार्या आमदारांचा शपथविधी समारंभात एकट्याने येण्याची सूचना देण्यात आली आहे.

समर्थकांना मोठ्या संख्येने आणू नये, कोरोना मार्ग सूचीनुसार शपथग्रहण होणार असल्याचे सर्वांना कळविण्यात आले आहे. मंत्रीपद मिळणार्‍या सर्व आमदारांना मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्वतः संपर्क साधून कळवले आहे.

20 जणांना मंत्रिमंडळात स्थान

पहिल्या टप्प्यात 20 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामध्ये भाजप पक्षनिष्ठ 9, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे समर्थक 5 जण आणि दिल्लीतील श्रेष्ठ व बोम्मई यांनी सुचविलेल्या 6 जणांचा समावेश असेल.

Back to top button