उसाचे गाळप गतवर्षीच्या तुलनेत २० हजार मेट्रिक टनाने वाढण्याचा अंदाज | पुढारी

उसाचे गाळप गतवर्षीच्या तुलनेत २० हजार मेट्रिक टनाने वाढण्याचा अंदाज

सोलापूर : संदीप येरवडे

गतवर्षीच्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 90 हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा उसाचे गाळप गतवर्षीच्या तुलनेत 20 हजार मेट्रिक टनाने वाढण्याचा अंदाज साखर कारखान्यांनी वर्तविला आहे. मात्र अतिरिक्‍त उसाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्याची ऊस गाळपाची क्षमता 1250 मेट्रिक टनापासून पुढे आहे. काही साखर कारखान्यांची कमू-जास्त ऊस गाळपाची क्षमता आहे. गतवर्षी जिल्ह्यात एकूण 1 लाख 35 हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते. यंदा 1 लाख 55 हजार मेट्रिक टन ऊस गाळप होण्याची शक्यता वर्तविली आहे.

त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 20 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मात्र यावर्षी 2 लाख 17 हजार मेट्रिक टन ऊस गाळप होण्याचा अंदाज बांधला आहे.

त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा उसाची लागवड चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी केली आहे. यंदाही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस सध्या जोमात आला आहे. त्यामुळे यंदा ऊस गाळप वाढणार आहे.

उसाचे गाळप वाढले तर अतिरिक्‍त ऊस गाळप शेतकर्‍यांना सतावणार आहे. त्यामुळे साखर कारखानदारांकडून दर पाडून ऊस खरेदी होऊ शकते. त्यामुळे अतिरिक्‍त उसाचे नियेाजन शासनाने करणे गजरेचे आहे. जेणेकरून शेतकर्‍यांच्या उसाला चांगला दर मिळू शकेल.

गतवर्षी साखर कारखान्यांना गेलेल्या उसाची रक्‍कम अद्याप साखर कारखानदारांनी दिलेली नाही. त्यामुळे एकीकडे ऊस गाळप वाढत असले तरी शेतकर्‍यांची एफआरपीची रक्‍कम वेळेवर देण्याची आवश्यकता आहे.

Back to top button