जीवसृष्टीचे पृथ्वीवरील सर्वात जुने पुरावे ‘या’ तलावात आहेत | पुढारी

जीवसृष्टीचे पृथ्वीवरील सर्वात जुने पुरावे ‘या’ तलावात आहेत

मेक्सिको सिटी : जगभरात अनेक सरोवरे आहेत. त्यामध्ये रशियाच्या सैबेरियातील ‘बैकाल’ या सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवराचाही समावेश आहे. मात्र, मेक्सिकोमध्ये एक असे सरोवर आहे जे आपल्या उदरात पृथ्वीवरील जीवसृष्टी चे सर्वात जुने पुरावे सांभाळून राहिलेले आहे.

या सरोवराचे नाव आहे ‘लेक बॅकालर’. हे सरोवर तब्बल 3.5 अब्ज वर्षांच्या ‘स्ट्रोमॅटोलायटिस’ या सूक्ष्म जीवांचे घर आहे. कॉलिफ्लॉवरसारख्या दिसणार्‍या प्रवाळसद़ृश्य रचनेत हे सूक्ष्मजीव राहतात.

हे सरोवर शंभर मीटर खोलीचे असून त्याचा तळ चुनखडीच्या खडकांचा आहे. बेलिझ बॉर्डरजवळील या सरोवरात अतिप्राचीन काळापासूनचे सूक्ष्मजीव आहेत. संशोधक डेल व्हॅल्ले यांनी याबाबतची माहिती दिली.

हे सरोवर गोड्या पाण्यात राहणार्‍या सूक्ष्म जीवांचे, प्रवाळांचे सर्वात मोठे घर आहे, असे त्यांनी सांगितले. तेथील सूक्ष्म जीवांचे वय काही दशकांपासून ते 9 हजार वर्षांपर्यंतही आहे.

मात्र, तेथील ‘जिवंत जीवाश्म’ म्हणून ओळखले जाणारे स्ट्रोमॅटोलाईटस् हे सुमारे 3.5 अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे हे सरोवर पृथ्वीवरील जीवसृष्टीचे सर्वात जुने पुरावे सांभाळणारे सरोवर ठरलेले आहे.

तलावाच्या चुनखडीच्या तळातून ही कॉलिफ्लॉवरसारखी रचना निर्माण होते. ते एखाद्या खडकासारखेच दिसतात; पण मात्र ते सजीव आहेत. हे जीव पृथ्वीवर अत्यंत तुरळक ठिकाणी आहेत; पण या सरोवरात जीवसृष्टी चे अस्तित्व प्रकर्षाने दिसून येते.

Back to top button