कोल्हापूर : झोपाळ्यावरून पडून एकुलत्या मुलाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : झोपाळ्यावरून पडून एकुलत्या मुलाचा मृत्यू

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : झोपाळा घेत असताना डोक्यावर आदळून गंभीर इजा झालेल्या पुलाची शिरोली ( माळवाडी) येथील सहा वर्षाच्या एकुलत्या चिमुरड्याचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. शौर्य संतोष गायकवाड असे बालकाचे नाव आहे. मनाला चटका लावणाऱ्या घटनेमुळे माळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी ( दि.२) दुपारी बारा वाजता शौर्य घरात बांधलेल्या झोपळ्यावर बसून झोके घेत होता. अचानक तोल जावून जोरात डोक्यावर आदळला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने बेशुध्द अवस्थेत त्यास कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक बनल्याने मध्यरात्री खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना सायंकाळी चिमुरड्याचा मृत्यू झाला. एकुलत्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच मोलमजुरी करणाऱ्या आई, वडिलांनी फोडलेला हंबरडा काळीज हेलावणारा होता. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण भोसले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शौर्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button